मुल :-
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत उथलपेठ येथे जागतिक स्तनपान दिन सप्ताहाला सुरवात झाली. तेथील समूह संसाधन व्यक्ती यांच्या घरी गावातील गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या महिला तसेच इतर महिलांना १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीतील स्तनपान कार्यक्रम बद्दल माहिती दिली. राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यावर्षी पण दि.1 ते 7 ऑगस्टदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यू’ या संकल्पनेतून सर्व आरोग्य संस्थेत ‘स्तनपान जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. यावेळी बाळाच्या जीवनातील पहिले १००० दिवस (स्त्री गरोदर राहिल्यापासून बाळ २ वर्षाचा होईपर्यंतचा काळ) हा बाळाची वाढ व विकास यासाठी महत्वाचा काळ असतो. मूल जन्माला आल्यानंतर आईने पाजलेले दूध हे तिच्या शिशु साठी अमृतासमान असते. आईच्या स्तनातून स्रवणाऱ्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषणघटक आई आणि मुलाच्या आरोग्यासाठी त्याचा होणारा फायदा याची तुलना कशाशीच केली जाऊ शकत नाही. स्तनपानाने मिळणारे दूध हे नक्कीच एक उत्तम पोषणमूल्ये असणारे आहे जे नवजात शिशुला अन्य कोणत्याच बाहेरील दुधातून मिळू शकणार नाही हे महिलांना समजावून सांगण्यात आले. यावेळी सरपंच, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान तालुका समन्वयक दिक्षा वनकर, आशाताई, बचत गट सी. आर.पी. व इतर महिला उपस्थित होत्या.