Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ०४, २०२१

चंद्रपूर जिल्हय़ात बिबटच्या दोन पिलांचा मृत्यू



ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र / नियतक्षेत्र सिंदेवाही मधील जाटलापूर गावाचे पांदन रस्त्यालगत बिबटच्या दोन पिलांचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 04/08/2021 रोजी सकाळी 6.30 वाजता च्या दरम्यान निदर्शनास आली .

माहिती प्राप्त होताच वनाधिकारी , क्षेत्रीय कर्मचारी व श्री बंडु धोतरे , NTCA प्रतिनिधी तसेच श्री विवेक करंबेळकर , मानद वन्यजीव रक्षक , ब्रम्हपुरी हे तात्काळ घटनास्थळी उपस्थितीत झाले . मृत पिलांचे शव शवविच्छेदनासाठी डॉ . सुरपाम , पशुवैद्यकीय अधिकारी , पंचायत समिती , सिंदेवाही , डॉ . संतोष गवारे , पशुधन विकास अधिकारी , सिंदेवाही व डॉ . पराग खोब्रागडे , पशुधन विकास अधिकारी , नवरगांव यांना पाचारण करण्यात आले . पशुवैद्यकिय अधिका - यांचे सदर चमुने बिबटच्या पिलांचे शव विच्छेदन केले . शवावरील जखमा व आसपास वाघाच्या पाऊलखुणा यावरुन सदरील पिलांचा मृत्यू वाघाचे हल्ल्यात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे . तथापी , शव विच्छेदन अहवालावरून पिलांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल . शवविच्छेदनानंतर उपस्थित सर्व वनअधिकारी / कर्मचारी , NTCA चे प्रतिनिधी व मानद वन्यजीव रक्षक , ब्रम्हपुरी यांचे समक्ष बिबटच्या पिलांच्या मृत शरीराचे दहन करण्यात आले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.