दिनांक २३ जुलै २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 च्या नियम 90 (1) मधील तरतुदीनुसार ही निवड समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीवर अध्यक्षपदी डॉ. फणसाळकर- जोशी तर सदस्य म्हणून अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटील, गजानन नामदेव मुंढे, श्रीम. निर्मला सांमत-प्रभावळकर, विकास रावजी सावंत, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई आणि महिला व बाल विकास आयुक्त, पुणे असे एकूण 6 सदस्य आहेत. समिती बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 (2016 चा 2) मधील तरतुदीनुसार जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष, सदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणूकी करिता राज्य शासनास शिफारस करणार आहे.
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठीत : महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे यांची माहिती