सेवा संस्थांसाठी शनिवारी ग्रामायणतर्फे कार्यशाळा
नागपूर, दि.17 : विदर्भातील सेवाभावी संस्थांसाठी ग्रामायण प्रतिष्ठानने. शनिवार 21 ऑगस्टला दुपारी चार ते साडेपाच या वेळात एका कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सी एस आर मदत आणि शासकीय प्रकल्प मिळण्यासाठी काय व कशी तयारी करावी ?, या विषयावर एका आभासी कार्यशाळेचे आयोजन आहे. नाबार्ड संस्थेचे निवृत्त महाव्यवस्थापक आणि या विषयावर प्रचंड अनुभव असलेले श्री देव या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
ज्या संस्थांना आपले प्रतिनिधी या कार्यशाळेत पाठवायचे असतील त्यांना आधी गुगल फॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी नोंदणी करणाऱ्यांनाच गुगल मीटची लिंक पाठवली जाईल. ही कार्यशाळा संपूर्णपणे निशुल्क आहे. या कार्यशाळेचा लाभ विदर्भातील एनजीओ ,सेवाभावी संस्था आणि सेवाभावी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानने केले आहे.
नोंदणी करण्यासाठी गुगल फॉर्म लिंक