Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २८, २०२१

युवकांच्या तत्परतेने ढिगाऱ्याखालील कुटूंब वाचले



जुन्नर/ वार्ताहर

भिंत अंगावर पडूनही युवकांच्या तत्परतेने एकाच कुटुंबातील ६ ही सदस्य आश्चर्यकारक रित्या वाचले आहेत.
रविवार पेठ येथील ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिराजवळ काल रात्री अंदाजे साडे आठ नंतर ही घटना घडली. जेवण झाल्यानंतर निवांत बसले असता सदर कुटूंबीयांवर भिंत कोसळून सर्व कुटुंब भिंतीखाली गाडले गेले,भिंत कोसळलयाचा आवाज ऐकून सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश जोगळेकर, अरुण शिंदे,अनिल सावंत ,व्यावसायिक बंडू कर्पे,मिलिंद झगडे, अभय पाठक, भागेश गाडेकर,महेश घोडेकर,हर्षवर्धन कुर्हे,मंदार ढोबळे तसेच रविवार पेठेतील इतर युवक कार्यकर्ते यांनी त्वरित मातीचा ढिगारा बाजूला करून सदर कुटुंबाला बाहेर काढले.त्यानंतर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे हलविण्यात आले. युवकांनी दाखवलेल्या तत्परतेचे जुन्नर परिसरामध्ये कौतुक होत आहे. हे कुटुंब परप्रांतीय असून उदरनिर्वाह साठी ५ ते ६ वर्षांपासून याठिकानी राहत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. अपघातात वाचलेले कुटुंबिय विनीत सहानी वय ४०,सौ.शोभा सहानी वय ३५, प्रतिक्षावय ११, श्रेया वय १०, श्वेता वय ५,विवेक १८ महिने (,सर्वजण राहणार संत कबीरनगर उत्तरप्रदेश) विनीत सहानी पेंटर म्हणून जुन्नर मध्ये काम करत आहे. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.