मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि मुंबई अल्ट्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी आयोजिलेल्या रक्तदान शिबिरासाठी ९८० लोकांनी नोंदणी केली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या शिबिरामध्ये ६६२ जण आले त्यामधील १५० व्यक्ती रक्तदान करण्यासाठी अपात्र ठरल्या आणि ५१२ लोकांचे रक्तदान यशस्वी झाले.
सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. दादर शिवाजी उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्माराकामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.