नवी मुंबई - उत्तर महाराष्ट्रात , मराठवाडा, पूर्वविदर्भ, प.विदर्भ या भागातील काही जिल्हातअति मुसळधार पाउस पडणार जनतेने सर्तक रहावे? व राज्यात दि.16 ऑगस्ट 17,18,19,20, 21,22,,24 ऑगस्ट या दरम्याण वरुण राजाचे विजेच्या कडकडाट सह जोरदार आगमण.
पिकांसाठी हा पाउस निर्णयक असेल.
माहितीस्तव - राज्यातील नादेंड लातूर हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा परभणी बिड जालना औरंगाबाद नगर जळगाव धुळे नंदूरबार नाशिक या जिल्हात अति मुसळधार पाउस पडणार जनतेने सर्तक रहावे. राज्यातील उर्वरीत जिल्हात पण कमी अधिक प्रमाणात आठवडा भर पाउस राहणार आहे.
देशातील अंदाज
दि. 14 ते 22 ऑगस्ट दरम्याण तेलांगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू ओडीसा, झारखंड प.बंगाल, मध्यप्रदेश हरयाणा उत्तर प्रदेश पंजाब बिहार, छत्तीसगड, या राज्यात. राज्यातील काही भागात पाउस मुसळधार अतिमुसळधार ,रिमझिम पडणार आहे.
वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
14/08/2021