आरोग्य विभागाच्या दिमतीला शिक्षक
राजुरा/ प्रतिनिधी
Covid-19 संकटापासून आरोग्य जोपासण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतलेली आहे. गावगाड्यातील नागरिकांचे 100% लसीकरण झाले पाहिजे या दृष्टीने आरोग्य विभाग जनजागृती करीत आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेत तालुक्यातील मंगी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकही शिक्षणा सोबत लसीकरण मोहिमेत खांद्याला खांदा लावून जनजागृतीचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची प्रशंशा होत आहे.
तालुक्यात मंगी खुर्द जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक परिसरातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे त्यांचे सहकारी सुधीर झाडे, श्रीनिवास गोरे पंडित पोटवी, मारुती चापले,
छोट्या छोट्या गुड्यावर जाऊन त्यांना प्रोत्साहित करीत आहेत. महिला, पुरुषांना लसीकरणाचे फायदे समजावून देत आहेत .एवढेच नव्हे तर त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन येणे त्यांना मार्गदर्शन करणे आणि सोडून देण्याचेही काम शिक्षक करीत आहेत. आरोग्य विभागाच्या दिमतीला शिक्षक खांद्याला खांदा लावून लोकजागृतीचे काम करीत आहेत. आतापर्यंत छोट्याशा गावातील मंगी येथील लसीकरण केंद्रावर परिसरातील ८०० पेक्षा अधिक लोकांनी लसीकरण करून घेतलेला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे आरोग्य विभागाला बळ मिळाले आहे . तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर 24 उपकेंद्र आहेत 64 ग्रामपंचायती व एकूण 103 गावे व २३गुडे असलेल्या तालुक्यात प्रत्येक गावांतील नागरिकांनी लसीकरण देण्याच्या सोयीचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. संवर्ग विकास अधिकारी डॉक्टर ओम प्रकाश रामावत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गाव 100% लसीकरण होण्याच्या दृष्टीने जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे. जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत, ग्रामसेवक , सरपंच रसिका ताई पेंदोर ,उपसरपंच वासुदेव चापले ,सचिव गजानन वंजारे, गाव समितीचे अध्यक्ष परशुराम तोडसाम, ग्रामपंचायत सदस्य शंकर तोडासे, आरोग्य विभागातील डॉक्टर ठाकूर आरोग्य सेविकाकोहपरे,लोणारे,गेडाम सिस्टर येथील महिलांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करीत आहेत. ऑनलाईन डाटा भरण्याचे काम आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसोबत जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुधीर झाडे स्वतः करीत आहेत . सामाजिक बांधिलकी जोपासून संकट काळात लोकांना जागृत करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक होत आहे.