Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ०३, २०२१

अखेर श्रमदान करून नागरिकांनी अपघातग्रस्त खड्डा भरला

बेशरमचे झाड लावून अमृताच्या कंत्राटदाराचा निषेध

चंद्रपूर : वडगाव प्रभागातील हवेली गार्डन ते सोमय्या पॉलिटेक्निक रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून  खड्डा पडलेला आहे. अमृत पाणी पुरवठा योजनेचा मोठा पाईप टाकल्यामुळे हा खड्डा पडला. या रस्त्यावरील पथदिवे वारंवार बंद राहतात.त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. अंधारामुळे  नवीन माणसाला रस्त्यावरील आडवा खड्डा दिसत नसल्याने तोल जाऊन दुचाकीस्वारांच्या अपघातांची मालिका सुरू झाली.

अनेकांना  अपघातामुळे गंभीर शारीरिक इजा सुद्धा झाली.या खड्ड्यामध्ये पडून आज  पावेतो अनेक नागरिकांचे अपघात झाले.वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला होता. नगरसेवक व महानगरपालिकेला तक्रार करूनही खड्डा बुजविण्याचे काम करण्यात आले नाही.

दरम्यान 2 जुलै रोजी रात्री या ठिकाणी दुचाकीने जाणाऱ्या दोन युवकांचा अपघात झाल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले.

संतप्त झालेल्या नागरिकांपैकी स्नेहनगर परिसरातील राजेश सरोदकर, दिलीप जेठवाणी, दिलीप मेहता, विनोद राठी, गणपत कावळे, नरेंद्र पवार, अमोल वानखेडे, अजय कपूर या नागरिकांनी 3 जुलै रोजी सकाळी 7 वाजता श्रमदान करून सदर अपघातप्रवण खड्डा बुजवला.श्रमदान करून खड्डा बुजविल्यानंतर नागरिकांनी त्याच खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून अमृत योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा तसेच महानगरपालिकेचा निषेध नोंदवला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.