नागपूर/ प्रतिनिधी
लोकमत - पर्यावरण व निसर्ग संस्था, घोगली, नागपूर तसेच गट ग्रामपंचायत बेसा - बेलतरोडी व पिपळा - घोगली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्ताचं नातं या सामाजिक बांधिलकीतून ४ जुलै रोजी 'स्वामीधाम' श्री स्वामी समर्थ मंदिर, बेसा, नागपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकमत व लाईफ लाईन रक्तपेढीकडून रक्तदात्याला प्रमाणपत्र व भेट वस्तू देण्यात आल्या. संस्थेच्यावतीने रक्तदात्याला फळ व फुल रोपे देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गट ग्रामपंचायत बेसाचे सरपंच सुरेंद्र बनाईत, पिपळाचे सरपंच नरेश भोयर,उपसरपंच प्रभू भेंडे , स्वामीधाम मंदिराचे अध्यक्ष दिनकर कडू, अर्ध्य सैनिक कॅन्टीनचे संचालक राहुल मानकर, चित्रकला व शिल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे निरीक्षक संदीप डोंगरे, खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूरचे निवृत्त संचालक राहुल गजभिये,बी. एम. रेवतकर, राजेश कडू,पर्यावरण व निसर्ग संस्थेचे सचिव मधुकर सुरवाडे, कोषाध्यक्ष राजेश सोनटक्के, राजेंद्र राजूरकर, अभय पवार, राम सेवतकर, अभिराम श्रोत्री, धनंजय खराडे प्रामुख्याने उपस्थित होते. लाईफ लाईन रक्तपेढीचे डॉ. रवी गजभिये व त्यांच्या चमुने या रक्तदान शिबिरामध्ये मोलाचे योगदान दिले.लोकमतच्या या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरण व निसर्ग संस्थेने आभार मानले व भविष्यातदेखिल आपल्या समाजभिमुख उपक्रमात आमचा सहभाग राहील असे आश्वासन दिले.Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, जुलै ०६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
द सिक्रेट डिजिटल मार्केटिंग अँड फ्रीलांसर पुस्तक प्रकाशित | the Secrets Digital Marketing and Freelancer) बुटीबोरी, नागपूर - युवा पत्रकार आणि आमची बुटीबोरी
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन जागा NCP Chandrapurराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप प
आवळे जयंतीनिमित्त परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केल्या भावना कर्मवीर हरिदास आवळे हे आंबेडकरी चळवळीचे खरे ध्वजव
मैत्रयच्या गुंतवणूकदारांनी दिलाआत्महत्येचा इशारा Maitray investors Nagpur संविधान चौकात साखळी मैत्रीण उद्योग समूहाच्
सावधान! वीजबिलासंदर्भातील बनावट एसएमएस | MSEDCL | cybercrime (adsbygoogle = window.adsbygoogle || []).pu
अभयारण्यात अश्लील नृत्याचा उभा धिंगाणा; नोटांची केली उधळण Tiger Paradise Resortअभयारण्यात अश्लील नृत्याचा उभा धिंगाणा; नोटांची क
- Blog Comments
- Facebook Comments