Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून १२, २०२१

पावसामुळे घर कोसळले; एका वृद्धाचा घटनास्थळी मृत्यु



शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) : तालुक्यात सतत पावसामुळे घर कोसळून घरात झोपलेल्या एका वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना दि.११ जूनला रात्रीच्या सुमारास तालुक्यातील पिपरी (देशमुख) येथे घडली. भाऊराव कडुकर (८०) रा.पिपरी असे वृद्ध मृत इसमाचे नाव आहे.

गेल्या ४-५ दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सदर घर कोसळले. रात्री सतत पाऊस सुरु होता यावेळी मृतक भाऊराव वृद्ध गाळ झोपेत असतांना अचानक त्यांच्या अंगावर घर कोसळले त्यात त्यांचा ८० वर्षीय वृद्ध इसमाचा यात मृत्यु झाला. वृद्धाच्या अशा या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.