Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून १७, २०२१

महत्त्वाकांक्षी इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाला मंजुरी

महत्त्वाकांक्षी इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाला मंजुरी  

जुन्नर /वार्ताहर 



शिरूर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी राज्याचे आरोग्यमंत्री मा.श्री. राजेशजी टोपे यांनी मंजुरी दिली आहे असे खासदार डाँ.अमोल कोल्हे यांनी पत्रकारांना माहिती दिली.

त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्याचे निर्देश आज आढावा बैठकीत देण्यात आले. 

तसेच डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटीला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.

प्रस्तावित मेडिसिटीमध्ये ट्रॉमा क्रिटीकल, कार्डिऑलॉजी, न्युरोलॉजी, डेंटल, नेफ्रोलॉजी, एन्डोस्कोपी, पेडिअॅट्रीक, ऑफथॅलमॉलॉजी, गॅस्ट्रोअॅन्ट्रॉलॉजी, एन्डोक्रायनॉलॉजी, 

हिमॅटॉलॉजी, गायनाकॉलॉजी, रेडिओलॉजी, ऑर्थोपेडीक, कॉस्मेटिक आणि बर्न सर्जरी, युरोलॉजी, पॅथॉलॉजी तसेच आयुष हॉस्पिटल इत्यादी सर्व विभागांसाठी स्वतंत्र २४ सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे असे ही खासदार डाँ.अमोल कोल्हे यांनी सांगितले . 

आरोग्यमंत्री टोपे यांच्या मंत्रालयातील दालनात आज बैठक पार पडली. या बैठकीला पुणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. रामास्वामी, डॉ. साधना तायडे, सहसचिव दिलीप गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून इंद्रायणी मेडिसिटीला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची आरोग्य यंत्रणा सुधारून अर्थव्यवस्थेला गती मिळेल. तसेच युवा वर्गाला रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.