शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती तालूक्यातील सांसद आदर्श ग्राम म्हणून निवड झालेल्या चंदनखेडा येथे मागील वर्षभरा पासून विविध विकास कामे सूरू आहेत त्यातीलच एक मुख्य काम म्हणजे भद्रावती ते चंदनखेडा पर्यंत जाणारा मार्ग रुंदीकरण. अतिशय संथ गतीने सूरू असलेल्या या कामा मुळे परिसरातील नागरिकांना दळण वळणाशी संबंधित विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
माजी खासदार तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांच्या कार्यकाळात सांसद आदर्श ग्राम म्हणून चंदनखेडा या गावाची निवड झाली त्या अंतर्गत इथे विविध विकास कामे करण्यात आली. यातील मुख्य काम म्हणजे भद्रावती ते चंदनखेडा पर्यंत सूरू असलेलं रस्ता रुंदीकरण. या कामाची सुरुवात झाली तेव्हा पासून तर आता पर्यंत विविध समस्यांना तोंड देत अतिशय कासव गतीने या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सूरू आहे. या मार्गात बऱ्याच ठिकाणी नाले असल्यामुळे पूल बांधत रस्त्याचे काम सूरू आहे. असेच एका पुलाचे बांधकाम चंदनखेडा येथील मुख्य मार्गात सूरू आहे. बऱ्याच दिवसांपासून खोदकाम करून असल्यामुळे. येथील नागरिकांना ये जा करण्या करिता कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सूरू झाल्या मुळे शेतकऱ्यांना शेती कामाकरिता याच मार्गाचा वापर करावा लागत आहे.
मागील महिन्यात याच मार्गावरून परत आपल्या घरी जात असलेल्या एका तलाठ्याला आपले प्राण गमवावे लागले आहे. असेच जर सूरू राहीले तर पुढेही जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित ठेकेदाराने त्वरित हे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून पुढे असल्या प्रकारचे अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.