Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २६, २०२१

लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?

 लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?

भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राज्य सरकारला सवाल


 


       

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नसल्याने राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे. अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असतानालशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे काअसा सवाल प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात एका पत्रकार परिषदेत केली. लस खरेदी प्रक्रिया नेमकी कशामुळे रखडली अडकली याचा राज्य तातडीने खुलासा करून सरकारने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावाअसेही ते म्हणाले.  

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी जागतिक निविदा काढण्याची घोषणा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्याबाबतच्या वाटाघाटींचे अधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीस देण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर वृत्तपत्रांतून निविदा जाहिराती प्रसिद्ध झाल्यामात्र महिना उलटूनही या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. अगोदरचमहाराष्ट्र सरकारच्या विश्वासार्हतेवर वाझेसारख्या वसुली प्रकरणांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावरून या निविदांना प्रतिसाद न मिळण्यात असेच काही कारण नसावे नाअशी शंका वाटू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने खुलासा करून पारदर्शकतेची हमी दिली पाहिजेअसे श्री. उपाध्ये म्हणाले.

म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचार प्रचंड खर्चिक असल्याने गोरगरिबांनासर्वसामान्यांना ते परवडणारे नाहीत.  राज्य सरकारने या आजारावरील 5 लाखांपर्यंतच्या  उपचाराचा खर्च करावाया आजारावरील उपचाराचे शुल्क निश्चित करावेया शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या रुग्णालयांवरडॉक्टरांवर सरकारने कारवाई करावी अशा मागण्याही श्री. उपाध्ये यांनी केल्या.

पदोन्नतीतील  आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप करून श्री. उपाध्ये म्हणाले कीआमच्यामुळे याबाबतच्या निर्णयाला स्थगिती मिळाली असल्याचा दावा काँग्रेस नेते करीत असले तरी या संदर्भातील समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली  भूमिका काँग्रेस नेत्यांनी का मान्य केलीयावरून काँग्रेस नेत्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.