Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २६, २०२१

प्राथमिक आरोग्य केंद्राचा बांधकामात अवैध मुरूमाचा वापर




नांदा फाटा :-
आरोग्या सेवा बळकट व्हावी ह्या हेतुतून नांदा फाटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारल्या जात आहे. परंतु आता हे आरोग्य केंद्र मानवी जीवनाच्या जीवावर उठणार की काय असा प्रश्न लोकांना जाणवू लागला आहे .बांधकाम अंतिम टप्प्यात असेल तरी बांधकामात अवैध मुरूम वापरल्या जात असल्याच्या खळबळजनक घटना समोर येत आहे मात्र महसून विभाग या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

शासनाने कोरोडो रुपये खर्च करून बांधकाम करीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये अवैध मुरुमाचा वापर होत असून आरोग्य केंद्राच्या बाजूलास अवैध रित्या जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन चालू आहे . शासनाच्या जागेवर विनापरवनगी उत्खनन करून शासनाची फसवणूक करण्याचे काम कंत्राटदार करत असून अश्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


प्रशासनाचे दुर्लक्ष
ग्रामपंचायत व महसूल विभाग यांचा परवानगी न घेता दिवसा ढवळ्या जेसीबी लावून रोज २० ट्रक अवैध मुरूम उत्खनन केल्या जात आहे. या कडे अधिकारी व प्रशासनाचे किती गाफील आहेत यावरन हे दिसून येते.
यापूर्वी ही अशाच प्रकारचे उत्खनन.
प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम सुरू होण्याची आधी देखील सापाटिकरणचा नावावर अश्याच प्रकारचे हजारो ब्रांस मुरूम उत्खनन केले होते. मात्र अधिकारी यांना हाताशी धरून प्रकरण रफा दफा केले होते.

अवैधरित्या उत्खनन करून नैसर्गिक संपत्तीला हानी पोहोचविण्याचे काम सदर कंत्राटदार करीत आहे. यावर अकुश लावण्यास ग्रामपंचातीत पदाधिकारी पुढे सरसावतील का..? की आपल्या हेतू साध्य करण्या करिता कंत्राटदारालाच साथ देतील या कडे मात्र लक्ष वेधले आहे.

माझ्या कडे त्यांनी कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नसून याची मला माहिती न्हवती. पाहणी करून चौकशी करण्यात येईल.
- विकास चीने तलाठी साजा नांदा)

सदर बाबीची मला काहीही कल्पना नाही. उद्याला भेट देवून याबाबत चौकशी करण्यात येईल. आर. गेडाम अभियंता साईड प्रभारी उपविभाग कोरपना

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.