Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ०२, २०२१

नव्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी कार्यभार स्वीकारला

श्री. अतुल कुलकर्णी, भापोसे यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. चंद्रपूर पोलीस दलातर्फे मनपूर्वक स्वागत व खूप खूप शुभेच्छा.





त्यापूर्वी ते गोंदिया जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. 24 एप्रिल रोजी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले.
अतुल कुलकर्णी हे सध्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील पोलिस उपमुख्यालयाचा कारभार पाहत होते. कुलकर्णी यांचा कार्यकाळ जिल्ह्यात एकंदरीत उत्तम राहिला असून त्यांनी नक्षल चळवळीवर चांगले नियंत्रण मिळविले होते व त्यासह अनेक मोठ्या गुन्ह्यांवर कार्यवाह्या केले होते. मोठ्या गुन्ह्यांचा तपास वेगात होऊन आरोपींना शिक्षा होण्याच्या मदत झाली होती. त्यांच्या कार्यकाळात कोरोनावर घेतलेली कडक भूमिकेमुळे अतिशय उत्कृष्ट काम केले आहेत. कर्मचाऱ्यावर पकड व गुन्हेगारांवर दहशत अशा पद्धतीचे काम अतुल कुलकर्णी यांचं राहिलेलं होतं.


राज्यातील 13 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त यांना पोलिस अधीक्षक/ पोलिस उप आयुक्त (असंवर्ग) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अतुल कुलकर्णी यांची अप्पर पोलिस अधीक्षक (गोंदिया) या पदावरून अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे. पदोन्नतीवरून बदली झालेल्या अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात सध्याचे ठिकाणी आणि पदोन्नतीनंतरचे ठिकाण पुढील प्रमाणे.

1. वैशाली विठ्ठल शिंदे (सहाय्यक आयुक्त, पुणे शहर ते अप्पर अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर)
2. अभय मुलचंद डोंगरे (सहाय्यक आयुक्त (गुन्हे), सोलापूर शहर ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना)
3. वैशाली उत्तमराव माने (अप्पर अधीक्षक, भरारी पथक, सीआयडी, पुणे ते पोलिस उपायुक्त (मुख्यालय), अमरावती)
4. रूपाली पोपटराव दरेकर (सहाय्यक आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, औरंगाबाद)
5.अनिता दिलीपराव जमादार (अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन, औरंगाबाद ते पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, औरंगाबाद)
6. किशोर मोहन काळे (पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), सांगली ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे)
7. अमोल भाऊसाहेब झेंडे ( सहाय्यक आयुक्त (एसबी), नवी मुंबई ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे)
8. प्रदीप वसंतराव जाधव (सहाय्यक आयुक्त (विभाग-1), नाशिक शहर ते अप्पर अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक)
9. अशोक दौलतराव बनकर (सहाय्यक आयुक्त (एसबी), औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, गोंदिया)
10. डॉ. शिवाजी पंडीतराव पवार (सहाय्यक आयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) पुणे शहर ते अप्पर अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)
11. रमेश मल्हारी धुमाळ (अप्पर अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते सहाय्यक महानिरीक्षक (नि.व स.), पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई)
12. अशोक रमेश थोरात (उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, सातारा ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र अकोला)
13. अशोक नखाते (सहाय्यक पोलिस आयुक्त, नाशिक शहर ते उप संचालक, डी.टी.एस. (गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय), नाशिक)



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.