Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २०, २०२१

तिसऱ्या लाटेपूर्वी कोराडी ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करा:प्राजक्त तनपुरे



 कोराडी वीज केंद्रास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट व पाहणी
कोराडी २० मे : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने महानिर्मितीने मिशन ऑक्सिजन मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ३ x ६६० मेगावाट क्षमतेच्या कोराडी वीज केंद्रातील ऑक्सिजन प्लांट आणि पावसाळ्याच्या पार्शवभूमीवर वीज उत्पादन अधिक सुरळीत राहावे सोबतच कोविड काळात नागरिकांना अखंडित वीज पुरवठा व्हावा या दृष्टीने ऊर्जा राज्यमंत्री मा.प्राजक्त तनपुरे यांनी २० मे रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा दौरा केला.
तिसरी लाट येण्यापूर्वी नागरिकांना कोराडी वीज केंद्रातून ऑक्सिजन उपलब्ध झाले पाहिजे यादृष्टीने युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वीज उत्पादनातील महत्वाचा घटक म्हणजे कोळसा. कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून गुणवत्ता, आवश्यक साठा आणि नियमित पाठपुरावा याकडे बारकाईने लक्ष दिल्यास,सोबतच स्पर्धात्मक पद्धतीने काम केल्यास अधिक कार्यक्षमता वाढेल आणि विजेचा उत्पादन दर कमी करण्यास हातभार लागेल अश्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.प्रारंभी त्यांनी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या मॉडेलची (प्रतिकृती) पाहणी करुन नियंत्रण कक्षातील अभियंत्यांशी संवाद साधला आणि बैठकीत तांत्रिक बाबींचाआढावा घेतला.कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी संगणकीय सादरीकरणातून वीज केंद्राची माहिती दिली.

 

महानिर्मितीच्या सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत महानिर्मिती आणि दत्ता मेघे मेडिकल कॉलेज अँड शालीनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापीत दवाखाना येथे भेट देऊन त्यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी केली.
दौऱ्यात मुख्य अभियंता राजकुमार तासकर,अनिल आष्टीकर,राजेंद्र राऊत, उप मुख्य अभियंता सुनिल सोनपेठकर तसेच वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.