यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील घोणसा येथील 18 वर्षीय मुलीने ग्लुकोज ऐवजी उंदीर मारण्याचे पावडर पिल्याने तिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याआधी प्राथमिक उपचारासाठी वनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढच्या उपचारासाठी तिला डॉक्टरांनी चंद्रपूर येथील रुग्णालयात नेण्याचे सांगितले आणि तिला चंद्रपुर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. येथे ती भरती देखील झाली मात्र नर्सच्या दुर्लक्षित पणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतक सानियाच्या पालकांनी केला आहे.
20 मे च्या रात्री डॉक्टरांनी तिला सलाईन व इंजेक्शन दिले त्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली, सानियाची आई व भाऊ यांनी परिचारिकेला याबाबत माहिती दिली मात्र तुमची मुलगी नाटक करत आहे असे बेजबाबदार वक्तव्य केले.
परिचारिकेने दुर्लक्ष केल्याने सानिया रात्रभर मृत्यूशी झुंज देत राहली. अखेर सकाळी सानियाने प्राण सोडले.सानिया ही 12 व्या वर्गात शिकत होती, वडील नसल्याने दोन भाऊ आणि सानियाच्या शिक्षणाची जबाबदारी आईने पूर्ण केली.
शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात कुळमेथे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले.
रुग्णांची सेवा करणे सोडून रुग्ण नाटक करीत आहे. असे वक्तव्य करणाऱ्या परिचारिकेवर कारवाई व्हावी अशी मागणी कुलमेथे परिवाराने केली आहे. आमच्या बहिणीचा जीव हा परिचारिकेच्या चुकीमुळेच गेला त्यामुळे तिला त्या कामाची शिक्षा मिळालीच पाहिजे असे मृतक युतीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.