कोरोना बाधितांना योग्य उपचार देऊन लसीकरण केंद्र वाढवा
कोविड च्या आढावा बैठकीत खासदार अशोक नेते यांचे निर्देश
सावली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने वेळीच उपचार होणे आवश्यक आहे त्यासाठी लसीकरण केंद्र वाढविन्यात यावे,गावांमध्ये जाऊन नागरिकांना प्रोत्साहित करून लसीकरण करण्यात यावे तसेच नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने शिबिर घेऊन जनजागृती करण्यात यावी , ऑक्सिजन सिलेंडर व लसीकरण च्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच सावली येथे 100 बेडचे कोविड सेंटर उघडण्यासाठी साहित्य व कर्मचारी च्या पूर्ततेसाठी मी वरिष्ठांना सूचना करणार असून लवकरच साहित्य उपलब्ध होणार असल्याचे यावेळी खास. अशोक नेते यांनी सांगितले. तसेच कोरोना बाधीत रुग्णाना योग्य उपचार देऊन त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांना लसीकरण साठी प्रोत्साहन देण्याचे निर्देशही यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.
खासदार अशोक नेते यांनी कोविडच्या परिस्थिती बाबत सावली तालुक्याचा आढावा घेतला असता आजपर्यंत तालुक्यात एकूण 873 कोरोना बाधित रुग्ण झाले असून सद्यस्थितीत 250 रुग्ण बाधीत आहेत सावली येथे 125 बेड ची व्यवस्था करण्यात आली असून 23 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहेत अजून पुन्हा 100 बेडची आवश्यकता असून ऑक्सिजन सिलेंडर व को- वैक्सिन लसीची आवश्यकता आहे. तथा 12 एमबीबीएस डॉक्टरांची गरज आहे. तसेच तालुक्यात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र असून 10 लसीकरण केंद्र द्वारे आतापर्यंत 45 वर्षावरील 10 हजार 600 नागरिकांचे लसीकरण झालेले असून अजून 70 टक्के लोकांचे लसीकरण होणे बाकी आहे त्यासाठी लसीकरण चा पुरवठा होणे गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गेहलोत यांनी सांगितले.
खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 24 एप्रिल रोजी सावली येथे तालुक्यातील कोविड परिस्थिती बाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला खासदार अशोक नेते, भाजपचे सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, तहसीलदार परिक्षित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत, नायब तहसीलदार सागर कांबडे,नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी मनीषा वजाडे, बीडीओ निखिल गावंडे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र वासनिक, वैद्यकीय अधीकारी व अन्य अधिकारी, विभाग प्रमुख,तसेच भाजपा शहर अध्यक्ष आशीष कार्लेकर यावेळी उपस्थित होते.