Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १७, २०२१

मंदिरावर "सायकल शिल्पाचा" तो फोटो खरा नाही

मंदिरावर "सायकल शिल्पाचा" तो फोटो खरा नाही  


दि १७ एप्रिल २०२१
सोशल मीडियावर एक सायकल चालवत असलेल्या दक्षिण भारतातील मंदिरावरील  शिल्पाचा फोटो व्हायरल होत असुन आपली भारतीय संस्कृती प्रगत होती, त्यावेळी सायकलचा शोध लागला असल्याचे त्यात म्हटले आहे.

मंदिरावर "सायकल शिल्पाचा" तो फोटो खरा नाही

तर ही पोस्ट व सायकल शिल्प खोटे आहे.
परवा माहिती सेवा ग्रूप पेठवडगावच्या फेसबुक पेजवर एकाने पोस्ट टाकली,त्यात एका माणसाचं शिलाचित्र होतं. हा माणूस सायकलवर बसून कुठेतरी जातो आहे अशा प्रकारचं ते चित्र होतं.या फोटोमध्ये एक माणूस सायकलवर बसला आहे त्याच्या आजूबाजूला फुलं आहेत, डोक्यावर टोपी आणि कानाच्या मागे फुल असं भिंतीवर कोरलेलं आढळून येतं.त्याबरोबर एक मेसेज लिहिला होता. तो असा-

▪️“तामिळनाडूमध्ये पंचवर्णस्वामी मंदिर आहे. त्याच मंदिरातील ही दोन हजार वर्षांपूर्वीची मूर्ती आहे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. असे असूनही सायकलचा शोध लावल्याचा मान मात्र दुसऱ्याच देशाला दिला जातो.भारताच्या या सोनेरी इतिहासाला विसरून केवळ भिकारी आणि मांत्रिकांचा देश असे चित्र उभे करण्याचे पाप कोणी केले???”▪️
हि माहिती खरी की खोटी याची खातरजमा न करता ही पोस्ट अनेक जण व्हायरल करत होते.
इंडिया टुडे या वृत्तसंस्थेच्या अँटी फेक न्युज वॉर रूम (AFWA) या विभागाने याची ही पोस्ट जेव्हा व्हायरल होऊ लागली तेव्हा त्यांनी याची सत्यता तपासली. त्यात त्यांना आढळून आलं की हा फोटो तामिळनाडूचा नाही. खरंतर हा फोटो भारतातील नाहीच. इंडोनेशियामधील एका मंदिरातील हा फोटो आहे.या AFWA ने जेव्हा याचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे कोरीवकाम बाली, इंडोनेशिया येथील Pura Meduwe Korang या मंदिरातील आहे. हा फोटो तुम्हाला tripsavy आणि bali local guide या वेबसाईटवर देखील सापडेल.
या पोस्टमध्ये उल्लेख केलेलं पंचवर्णस्वामी हे शिवमंदिर तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली येथील आहे. शोध घेत असताना the hindu या वृत्तपत्राच्या एका लेखात या मंदिरात असलेल्या सायकलवरील माणसाच्या शिलालेखाचा उल्लेख आढळतो. पण त्यातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे शिलाचित्र साधारण 1920च्या दरम्यान मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी कोरण्यात आलेले आहे.

मंदिरावर "सायकल शिल्पाचा" तो फोटो खरा नाही

हे शिलाचित्र भारतातील मंदिरातील नाही आणि सायकलचा शोधही जर्मनमध्ये लागला आहे.हे सत्य आहे.सायकलचा शोध Barl Karl von Drais यांनी 1817मध्ये जर्मनी येथे लावला.तरी कोणतिही पोस्ट forward करताना त्याची सत्यता तपासुन मगच पुढे 𝕗𝕠𝕣𝕨𝕠𝕣𝕕  करा.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.