Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

व्हायरल सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्हायरल सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जून १६, २०२१

सुप्रीम कोर्टाने 15 जूनपासून देशाचे नाव फक्त ‘भारत’ करण्याचा आदेश दिलेला नाही

सुप्रीम कोर्टाने 15 जूनपासून देशाचे नाव फक्त ‘भारत’ करण्याचा आदेश दिलेला नाही

 

 सुप्रीम कोर्टाने 15 जूनपासून देशाचे नाव फक्त ‘भारत’ करण्याचा आदेश दिलेला नाही 

सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजचे सत्य काय?


सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. त्यात म्हटले आहे की, १५ जुन पासुन देशाचे नाव "भारत" करण्यात येणार असुन सुप्रिम कोर्टाने तसा आदेश दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने 15 जूनपासून देशाचे नाव फक्त ‘भारत’ करण्याचा आदेश दिलेला नाही

या पोस्टची खातरजमा न करता प्रत्येक जण ही पोस्ट फॉरवर्ड करत सुटला आहे.माहिती सेवा ग्रूप कडे पण ही पोस्ट आली म्हणुन आम्ही न्युजचेकरकडे चौकशी केली असता वेगळाच प्रकार समोर आला.

सुप्रीम कोर्टाने 15 जून 2021 पासून India हे नाव आता कोणत्याही सरकारी अथवा खाजगी व्यवहारात वापरता येणार नाही, असा आदेश दिला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला या संदर्भात बातमी आढळून आली नाही मात्र आम्ही अधिक शोध घेतला असता आम्हाला मागील वर्षी म्हणजेच 02 जून 2020 रोजीची महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, राज्यघटनेतीलल इंडिया हे नाव काढून टाकण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
बातमीनुसार, India, that is Bharat (भारत, अर्थात इंडिया), असे भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमात देशाचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र, भारत हा देश एकच असताना, देशाला २ नावे कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत हे प्रकरण आता याचिकेच्या स्वरूपात सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
भारत हा शब्द गुलामगिरीचे लक्षण आहे, असा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद आहे. आणि म्हणून त्याऐवजी भारत किंवा हिंदुस्थान या शब्दांचा वापर करावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.
आम्हाला 03 जून 2020 रोजीची तरुण भारतची बातमी आढळून आली. ज्यात ‘इंडिया’ नाव बदलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली अशी माहिती देण्यात आल्याचे आढळून आले. यात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये नमूद असलेले देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून त्याजागी ‘हिंदुस्तान’ किंवा ‘भारत’ करण्यात यावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने याचिकाकर्त्यांना धक्का बसला आहे. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी, त्यावर संबंधित मंत्रालय निर्णय घेईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
याशिवाय आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर या निर्णयाची प्रत देखील आढळून आली. मात्र केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतल्याची किंवा स्पष्टिकरण दिल्याची माहिती किंवा माहिती आढळून आलेली नाही. यावरुव स्पष्ट झाले की, सुप्रीम कोर्टाने 15 जून 2021 पासून देशाचे नाव फक्त भारत असण्याचा आदेश दिलेला नाही.
तरी वरील प्रमाणे तुम्हाला मेसेज आला असेल तर पूर्णपणे खोटा असल्याने कोठेही फॉरवर्ड करू नका
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

शनिवार, एप्रिल १७, २०२१

मंदिरावर "सायकल शिल्पाचा" तो फोटो खरा नाही

मंदिरावर "सायकल शिल्पाचा" तो फोटो खरा नाही

मंदिरावर "सायकल शिल्पाचा" तो फोटो खरा नाही  


दि १७ एप्रिल २०२१
सोशल मीडियावर एक सायकल चालवत असलेल्या दक्षिण भारतातील मंदिरावरील  शिल्पाचा फोटो व्हायरल होत असुन आपली भारतीय संस्कृती प्रगत होती, त्यावेळी सायकलचा शोध लागला असल्याचे त्यात म्हटले आहे.

मंदिरावर "सायकल शिल्पाचा" तो फोटो खरा नाही

तर ही पोस्ट व सायकल शिल्प खोटे आहे.
परवा माहिती सेवा ग्रूप पेठवडगावच्या फेसबुक पेजवर एकाने पोस्ट टाकली,त्यात एका माणसाचं शिलाचित्र होतं. हा माणूस सायकलवर बसून कुठेतरी जातो आहे अशा प्रकारचं ते चित्र होतं.या फोटोमध्ये एक माणूस सायकलवर बसला आहे त्याच्या आजूबाजूला फुलं आहेत, डोक्यावर टोपी आणि कानाच्या मागे फुल असं भिंतीवर कोरलेलं आढळून येतं.त्याबरोबर एक मेसेज लिहिला होता. तो असा-

▪️“तामिळनाडूमध्ये पंचवर्णस्वामी मंदिर आहे. त्याच मंदिरातील ही दोन हजार वर्षांपूर्वीची मूर्ती आहे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. असे असूनही सायकलचा शोध लावल्याचा मान मात्र दुसऱ्याच देशाला दिला जातो.भारताच्या या सोनेरी इतिहासाला विसरून केवळ भिकारी आणि मांत्रिकांचा देश असे चित्र उभे करण्याचे पाप कोणी केले???”▪️
हि माहिती खरी की खोटी याची खातरजमा न करता ही पोस्ट अनेक जण व्हायरल करत होते.
इंडिया टुडे या वृत्तसंस्थेच्या अँटी फेक न्युज वॉर रूम (AFWA) या विभागाने याची ही पोस्ट जेव्हा व्हायरल होऊ लागली तेव्हा त्यांनी याची सत्यता तपासली. त्यात त्यांना आढळून आलं की हा फोटो तामिळनाडूचा नाही. खरंतर हा फोटो भारतातील नाहीच. इंडोनेशियामधील एका मंदिरातील हा फोटो आहे.या AFWA ने जेव्हा याचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे कोरीवकाम बाली, इंडोनेशिया येथील Pura Meduwe Korang या मंदिरातील आहे. हा फोटो तुम्हाला tripsavy आणि bali local guide या वेबसाईटवर देखील सापडेल.
या पोस्टमध्ये उल्लेख केलेलं पंचवर्णस्वामी हे शिवमंदिर तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली येथील आहे. शोध घेत असताना the hindu या वृत्तपत्राच्या एका लेखात या मंदिरात असलेल्या सायकलवरील माणसाच्या शिलालेखाचा उल्लेख आढळतो. पण त्यातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे शिलाचित्र साधारण 1920च्या दरम्यान मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी कोरण्यात आलेले आहे.

मंदिरावर "सायकल शिल्पाचा" तो फोटो खरा नाही

हे शिलाचित्र भारतातील मंदिरातील नाही आणि सायकलचा शोधही जर्मनमध्ये लागला आहे.हे सत्य आहे.सायकलचा शोध Barl Karl von Drais यांनी 1817मध्ये जर्मनी येथे लावला.तरी कोणतिही पोस्ट forward करताना त्याची सत्यता तपासुन मगच पुढे 𝕗𝕠𝕣𝕨𝕠𝕣𝕕  करा.

शुक्रवार, ऑक्टोबर ०९, २०२०

अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य

अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य

अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य  

'

फेसबुक लिंक https://bit.ly/2SFoXT9
सोशल मीडियात कधी कुठला फोटो,व्हिडिओ किंवा मेसेज व्हायरल होईल हे सांगू शकत नाही.

अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू
मग, तो एखादा जोक असू शकतो, व्हिडिओ असू शकतो किंवा काही सूचनाही असू शकते. सध्याच्या काळात कमीत-कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत एखादी गोष्ट पोहचविण्यासाठी ती गोष्ट व्हायरल होणं गरजेचं असतं आणि व्हायरल होण्यासाठी सोशल मीडिया या सर्वात चांगला प्लॅटफॉर्म आहे. आता नुकताच एक मेसेज व्हायरल होत आहे.व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, अंड आणि केळ खाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अंड खाल्यानंतर लगेच केळ खाऊ नका. हा मेसेज नेमका काय आहे आणि त्यामगचं सत्य काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्हायरल झालेला मेसेज आहे की…
“महत्वाची सूचना… अंड खाल्ल्यानंतर लगेचच केळ खाणा-या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचं पोस्टमार्टम केल्यानंतर कळालं की, त्या व्यक्तीनेअंड खाल्यानंतर केळ खाल्लं होतं आणि त्यामुळे त्याच्या पोटात अंड आणि केळाच्या मिश्रणाचं विष तयार झालं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. म्हणून अंड खाल्यानंतर तात्काळ केळ खाऊ नका कारण यामुळे मृत्यू होण्याचीशक्यता आहे.” हा मेसेज केवळ आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवू नका तर तुमच्या इतर सहकारी, मित्र, परिवारातील सदस्यांपर्यंत पोहोचवा जेणूकरुन त्यांनाही याबाबत माहिती मिळेल.

या मेसेज संदर्भात हेल्थ एक्सपर्टने म्हटलं आहे की, असं काहीही नाहीये. तसेच केळ, अंड आणि इतर फळही शरीरासाठीखुपच चांगले आणि लाभदायक असतात.