आपल्या पिलांसाठी आई तब्बल तीन सापांशी भिडली, पाहा कोंबडीचा थरारक लढा
___________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
___________________________
मातेच्या मायेला काही सीमा नसतात. आईचे प्रेम हे निस्वार्थ आणि पारदर्शी असतं. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. त्याचीच प्रचिती एका व्हिडीओमधून येतेय. या व्हिडीओमध्ये एक कोंंबडी आणि तिच्या पिलांना अनेक सापांनी घेरलं आहे. हे साप नुकत्याच जन्मलेल्या पिलांना गिळंकृत करण्यासाठी टपून बसले आहेत. सापांचा हा डाव ओळखून या कोंबडीने पिलांन आपल्या पंखाखाली घेतलं आहे. ती आपल्या पिलांचे जमेल त्या पद्धतीने रक्षण करत आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.एका जुन्या घरात कोंबडी आणि तिच्या पिलांना सापांनी घेरलं आहे. यामध्ये कोंबडी आपल्या पिलांना घेऊन लपण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा हे साप कोंबडीच्या पिलांवर हल्ला करतात. तेव्हा ती आपल्या चोचीने सापांचा हल्ला परतवून लावते आहे. ती सापांवर आपल्या चोचीच्या साहाय्याने हल्ला करताना दिसत आहे. कसोशीने प्रयत्न करुन ही कोबंडी हिम्मत आणि प्रेमाच्या जोरावर आपल्या पिलांना सापांच्या तावडीतून सोवडत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान हा व्हिडीओ जंगल बुक्स (The Jungle Books) नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक युजर्सना कोंबडीचे धैर्य़ आणि आपल्या पिलांप्रती तिचे असलेले प्रेम खूप आवडत आहे.