चंद्रपूर/ललित लांजेवार:
राज्यात कारोनाचे डबल म्युटेशन होत असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. मृत्यूची संख्या देखील दररोज वाढत चाललेली आहे. उपचारासाठी बेड न मिळत असल्यामुळे रुग्णांना वणवण फिरावे लागत आहे. रुग्ण वाढल्यामुळे राज्यात आरोग्य सुविधा तोकडी पडत आहे. अशातच चंद्रपुरात संतापजनक घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उपचारासाठी बेड न मिळाल्याने एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने थेट दवाखान्याच्या बाहेर असलेल्या बस स्टँडच्या बैठक खुर्चीवर दम तोडला.
गोविंदा निकेश्वर व्य 50 वर्षे असे या मृतकाचे नाव आहे आपल्याला कोरोना झाले असल्याचे कळल्यानंतर त्यांनी घरून निघत दवाखान्यात भरती होण्याचा निर्णय घेतला मात्र दवाखान्यात उपचारांसाठी एकही बेडखाली नसल्यामुळे ते खाजगी आणि शासकीय दोन्ही रुग्णालयात गेले. मात्र येथेही बेड नसल्याचे कळल्यानंतर ते ख्रिस्तानंद हॉस्पिटल चौक येथे पोहोचले. मात्र त्यांना कोणीही भरती करून घेतले नाही.अखेर त्यांना रुग्णालयात रुग्णालयाबाहेर असणाऱ्या बस स्टैंड छावणीतच दम सोडावा लागला.
विशेष म्हणजे ब्रह्मपुरी मतदारसंघ हा राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा आहे.आणि त्यांच्याच मतदारसंघात रुग्णांचे अशा प्रकारे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे.अपुरी आरोग्य व्यवस्था. व यंत्रणेवर येणारा ताण हा आवाक्याबाहेर होत असल्यामुळे आता रुग्णालयातील खाटा वाढवणे, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बेडची संख्या व्हेंटिलेटर वाढवणे अत्यंत गरजेचे असणार आहे.