Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १८, २०२१

गोवरीत कोवीड रुग्णांची संख्या 66 वर




प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित..

सहा वर्षाच्या मुलासह तरुणांनाही संसर्ग.

राजुरा/प्रतिनिधी
मागील दोन आठवड्यापासून गावात तापाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाने अँटीजीन तपासणी शिबीर लावलेले आहे. तापाच्या साथीत आतापर्यंत दोन व्यक्ती मृत्यू झालेला आहे त्यामुळे गावातील नागरिकही दहशतीत आहेत. आरोग्य विभागा मार्फत दोन दिवसापासून अँटीजीन तपासणी सुरू आहे. आत्तापर्यंत 170 नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यात 42 नागरिक कोरोना बाधित आढळले. सद्यस्थितीत गौवरी येथे 66 रुग्ण ऍक्टिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश नगराळे यांनी दिली. यात 18 वर्षाखालील तरुणांचे व एका सहा वर्षीय मुलाचा सुद्धा समावेश असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.




कोविंड रुग्णांची संख्य वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये गोवरी गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले आहे. त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे.
तहसीलदार हरीश गाडे यांनी गौवरी येथे भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली आणि शासनाच्या नियमाचे पालन करण्याचे निर्देश दिले. कोवीड बाधितांना उपचारासाठी कोरोणा केंद्रावर पाठवण्यात आलेले आहे. आज दि. 18 एप्रिल ला दुसऱ्या दिवशीही प्राथमिक स्वास्थ्य केंद्र कडोली च्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपिन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय गावातील प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण करीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपिनकुमार ओदेला , आरोग्य कर्मचारी सुरेश कुंभारे, गाडगे, ढोके आशा वर्कर गावातील प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण करीत आहेत. तापाच्या साथी वर नियंत्रण मिळवण्यासाठी अँटीजीन तपासणी शिबीर लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे शिवाय तपासणी करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिवंडी पीटविण्यात आली आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे ग्रामपंचायतचे सरपंच आशा उरकुडे, उपसरपंच उमेश मिल्मिले, ग्राम विकास अधिकारी संजय तुरारे,सर्व सदस्य गावातील स्वयंसेवी संस्था, पदाधिकारी हे लोकांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.




तालुक्यात ग्रामीण भागांमध्ये कोविडचे रूग्ण वाढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. गावात कोबीड रुग्ण वाढल्याने गोवरी गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे. रामपूर , साखरी, चूनाळा , सास्ती, बामनवाडा ही गावेही हॉटस्पॉट ठरत आहेत.

ग्रामीण भागात 5 नव्या लसीकरण केंद्राला मान्यता...

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राजुरा तालुक्यात ग्रामीण भागामध्ये पाच नव्याने लसीकरण केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये आर्वी, पाचगाव ,विहीरगाव, भुरकुंडा, चनाखा केंद्रांचा समावेश आहे.
गोवरी येथे ऑंटीजीन तपासणी करण्यात आली. यामध्ये अठरा वर्षाखालील तरुण व सहा वर्षीय मुलाचाही समावेश आहे .त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी. काही सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ covid-19 चाचणी करावी व वैद्यकीय उपचार घ्यावे. तरुणांनी घराबाहेर फिरू नये. शासनाच्या नियमांचे पालन करावे.
डॉक्टर विपिन कुमार ओढेला,
वैद्यकीय अधिकारी, कडोली...


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.