Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १४, २०२१

साहित्य क्षेत्रातील नामवंत कथा, कादंबरीकार, लेखिका: विजयाताई ब्राम्हणकर

शंकर जाधव.
7875015199

सौ.विजयाताईनी घर-संसार, साहित्य चळवळ सांभाळून साहित्य क्षेत्रात कथा, कादंबरी, बाल वाड्.मय या साहित्य प्रकारातून आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे.त्यांच्या शांत, मृदुभाषी, प्रेमळ व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनातही पडलेलं दिसून येते.त्या एक प्रथितयश लेखिका आहेत. त्यांची भाषा, शैली ओघवती आहे. त्यांचा साधेपणा, स्वाभाविकता, सभ्यपणा, संयमी , साधी राहणी, चांगले विचार असणार्या विजयाताई नेहमी आठवणीत राहतात.
विजयाताईनी अनेक कादंबर्या, कथासंग्रह, बालवाड्.मय लिहिले आहे.त्यांच्या सामाजिक कादंबर्या---निशिगंधाचं नातं, हेच माझे माहेर, आधारशिला, प्राॅमिस, ढगाळलेलं आकाश, छोटी मां, श्रावणी, यमू, सोनेरी सांज, आवली तू होतीस म्हणून ह्या कादंबर्यांना लोकप्रियता मिळाली आहे.
त्यांचे प्रकाशित झालेले कथासंग्रह --सुखाचं क्षितिज, पाहुणी, मनसुबा, गुलमोहर व अलिकडिल "ऋणानुबंध" मराठी कथा विश्वात नुकताच प्रकाशित झाला आहे.
तसेच बालवाड्.मय --मानवतेच पुजारी, अमर भगतसिंह, दीनांचा कैवारी, तेजस्विनी अहिल्या, गाभार्यातील स्वप्न, सदगुणी मित्र.एकांकिका- आधार शोधते मी, स्तंभ लेखन-- सागर गोट्या ,इत्यादि साहित्य मराठी वाचकांच्या लक्षात आहेत.त्यांना अनेक गौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेले आहेत.
कै. शांताबाई योगी पुरस्कार
कै.कृष्णाताई मोटे पुरस्कार
कै.उद्धव शेळके पुरस्कार
ना.स. देशपांडे पुरस्कार
शैक्षणिक व सांस्कृतिक पुरस्कार, विदर्भ साहित्यसंघ पुरस्कार, रसिकराज कादंबरी पुरस्कार, निर्धार महिला पुरस्कार, शब्दांगण पुरस्कार इत्यादि पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
      त्यांची  "सोनेरी सांज " ही वृध्दांच्या जीवनावरील ह्रदयस्पर्शी नावाजलेली कादंबरी  आहे.  वृध्द आणी वृध्दाश्रम  हा विषय घेऊन ही  कादंबरी लिहिली आहे. संजीवन वृध्दाश्रमाची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभलेली आहे.लेखिकेने  वृध्दांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वध्दत्व  हेही एक दुःखच आहे
 समाजात वावरतांना  अनेक दुःखे वृध्दांच्या पावलोपावली  विखूरवेली दिसतात. त्यांच्या दुःखाचे,वेदनेचे पदर न मोजता येणारे आहेत. साथ हरवलेल्या वृध्दांचं दुःख तर कैकपटीने अधिक असतं. शिवाय  त्या अनुष॔गाने येणार्या वेदना, संवेदना, अवमान, अपमान, अवहेलना, उपेक्षा  यांचा धूर जीव आदमुसा कसा करून टाकतो हे लेखिकेने ह्यांत दर्शविले आहे. वृध्दाश्रमात वृध्दांना का  यावं लागतं हे सांगण्याचा प्रयत्न सुध्दा लेखिकेनी केला  आहे. नात्यातला ओलावा कमी झाला आहे.वृध्दाश्रमाकडे आधार या दृष्टिकोनातून बघावे म्हणजे अनेक गैरसमजूती दूर होतील असे लेखिकेनी स्पष्ट केले आहे. 
          विजयाताईंची  दुसरी नावाजलेली कादंबरी " आवली , तू होतीस म्हणून " ही समकालीन मराठी साहित्यामधील एक नोंद घेण्याजोगी कादंबरी आहे. संत ज्ञानेश्वरापासून सुरू झालेल्या वारकरी संप्रदायाचा कळस ठरलेल्या तुकारामाची बायको " आवली"  हिला केंद्रस्थानी ठेवून लेखिकेने ही कादंबरी लिहलेली आहे. सर्व जनमानसाला, आपल्या कीर्तन-अभंगातून आध्यात्मविचार समाजातून सांगणारे तुकाराम (बूवा)  यांची जगाला ओळख आहे. मात्र आवली आणी तुकाराम या दोघांचा लौकिक संसार स्वतःच्या शक्तिनिशी नेटाने सांभाळणारी आवली मात्र तिच्या श्रेयापासून वंचितच राहिली.आणी नेमके हेच वास्तव लेखिकेनी संवेदनशीलतेने या कादंबरीमधून उघड केले आहे.लेखिकेनी  आवलीला या कादंबरीमधून  सजीव  साकारण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.या कादंबरीत आवली-तुकाराम सोबत विठ्ठलही सतत अवती भोवती वावरतोय असा भास निर्माण करण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे.आवली होती म्हणून तुकाराम आकाशा एवढे मोठे झाले पण आवलीचे काय?  स्रीच्या जीवनाचे सार्थक कशात असते याचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखिकेने आवली-तुकारामाच्या जीशन प्रवासाचा वेध घेत असल्याचे दिसते.
                विजयाताईंचा नुकताच प्रकाशित झालेला  लोकांच्या पसंतीचा  कथासंग्रह " ऋणानुबंध " होय.  आठ दीर्घकथा असलेल्या या कथासंग्रहातील पात्रे साधे, सामान्य जीवन जगणारी मध्यम वर्गीय जीवनाकडे सकारात्मकतेने पाहणारी , इतरांना घेऊन चालणारी, सरळ वळणाची असल्याने ती वाचकांना आपल्या जिव्हाळ्याची व जवळची वाटतात
. ॠणानुबंध  हा त्यांचा पाचवा कथासंग्रह असून त्यांच्या शांत , प्रेमळ व मृदूभाषी व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनातही पडलेलं दिसून येते.या कथा मधून भेटणार्या स्रिया समंजस, भावूक, कुटूंबाला धरून चालणार्या  आहेत. मानवी नातेसंबधातील इच्छा-आकांक्षा-अपेक्षांचे एकमेकांत गुंतलेले, ते सोडवतांना होणारी दमछाक, अपेक्षा भंगाचि तणाव, घुमसट अनेक कथामधून लेखिकेनी सांगीतली आहे.आजच्या सर्वच साहित्य प्रकारांच्या पुढ्यात असणारे सामाजिक वास्तव हे या प्रकारचे आहे.
         विजयाताईंना त्यांच्या पूढच्या  कथासंग्रहासाठी व कादंबरीसाठी मनःपूर्वक सदिच्छा.🙏🙏 
     
            ..       शंकर दादा जाधव. 7875015199.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.