Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च १३, २०२१

थरारक घटना,वीज पडतानाचा व्हिडिओ सी.सी.टी.व्ही. कैद.

 

💥 थरारक घटना,वीज पडतानाचा व्हिडिओ सी.सी.टी.व्ही. कैद.
______________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________
दिल्लीतील गुरुग्राममध्ये ही घटना घडली आहे.गार्डनमध्ये काम करणारे चार मजूर अचानक पाऊस सुरू झाला म्हणून आसऱ्यासाठी एका झाडाखाली धावले.

झाडाखाली उभ्या असलेल्या चौघांवर काळाने झडप घातली, पण सुदैवाने चौघेही मृत्यूचा दारा धडक मारून मरत आले.

गुरूग्राममधील सिग्नेचर विला वाटिकेत ही घटना घडली आहे.
सायंकाळी गुरुग्राम परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली.
यावेळी तिथे माळी काम करणारे चार मजूर वाटिकेतीलच एका झाडाखाली आसऱ्यासाठी उभे राहिले.
याच वेळी अचानक झाडावर वीज कोसळली. या वीजेच्या तडाख्यात हे चारही मजूर सापडले.
उभे असलेले मजूर कोसळले.ही घटना सी.सी.टी.व्ही.त कैद झाली आहे. उभे असलेले मजूर आणि त्यांच्यावर वीज कोसळताना दिसत आहे.
वीज पडल्यानं चौघेही बेशुद्ध झाले.
दरम्यान,  व्हि.डी.ओ. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, बघणाऱ्यांच्या अंगावर शहारा यावा अशीच ही घटना आहे.
यात वीज कोसळताना आणि मजूर खाली पडताना स्पष्टपणे दिसत आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.