Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २५, २०२१

ताडोबात कार अपघातात बिबट्याचा मृत्यू; तीन दिवसांनी सुटली वास



खबरबात

चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-पद्मापूर मार्गाच्या बाजूला कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक होत आहे. रविवारी ज्या ठिकाणी भरधाव कारने झाडाला धडक दिली, त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर मृत बिबट्या आढळला आहे.


ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा पद्मापूर गेट पासून 500 मीटरच्या अंतरावर दि.  21 मार्च रोजी रात्री 9.30 च्या सुमारास MH34 BR 6979 या कार ने झाडाला जोरदार धडक दिली.या अपघाता मध्ये  दोन पर्यटक गंभीर जखमी  झाले.  पद्मपुर गेट इंजार्च धमके मॅडम यांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपले दोन मदतनीस घटनास्थळी  पाठविले आणि अपघातात जखमी झालेल्याना दुसऱ्या कारने उपचारासाठी  रुग्णालयात पाठविले. आपल्या वरिष्ठ अधिकारी सदर अपघाताची सूचना दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार ही बल्लारपूर येथील रजत परमार यांची असून, त्यांच्या सोबत दोघे अपघाताच्या वेळेस कारमध्ये होते. हा अपघात एवढा जोरदार होता की कार ने धडक दिलेल्या झाडाची फांदी कारच्या पुढील भागवर तूटून पड़ली त्यामुळे कार चा पुढील भाग चपकुन गेला तसेच अपघात स्थळा पासून काही अंतरावर डिक्सचे टुकड़े आढळून आले. या वरुन असे लक्षात येथे की सदर कार ही किती वेगात होती. सदर अपघाताने पुन्हा एकदा  मद्यधुंद पर्यटकामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवाचा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मोहर्ली-पद्मापूर मार्गाच्या बाजूला  बिबट मृतावस्थेत आढळला. रविवारी ज्या ठिकाणी भरधाव कारने झाडाला धडक दिली, त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर मृत बिबट्या आढळला आहे.  3 दिवसांनी या भागात दुर्गंधी पसरल्यावर बिबट मेल्याचा सुगावा मिळाला. यावरून याच कारने धडक देऊन बिबट्यास मारल्याचा संशय व्यक्त होत आहे.  

वन्यजीवांची मोठी वर्दळ असलेल्या मोहूर्ली मार्गावर मद्यधुंद पर्यटक वाहनांचा अतिवेग वनविभागासाठी चिंतेची बाब बनली आहे, अशी टीका ग्रामस्थांनी खबरबात प्रतिनिधीकडे व्यक्त केली. 

वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून, मृत बिबट्याचे पोस्टमोर्टम करण्यात आले. यावेळी सहायक वन संरक्षक येडे, वन परीक्षेत्रअधिकारी मुन, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, डॉ. कडुकर, डॉ. खोब्रागडे, डॉ. पोदाचलवार उपस्थित होते. '


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.