एम.बि.बि.एस. डॉक्टर त्वरीत देण्याची मागणी भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे सचिव शरद सोनवाने यांची मागणी
पाथरी : - ग्रामीण भागातील सर्वसामाण्य व गोरगरीब जनतेचे आरोग्य जोपासण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्यवर्धीनी केन्द्राची निर्मीती करण्यात आली परंतु सावली तालुक्यातील पीएचसी आणी उपकेन्द्रात कर्मचारी तथा डॉक्टरांअभावी रूग्णांचे बेहाल होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
पाथरीची लोकसंख्या 3 हजार 582 एवढी असुन या प्राथमिक आरोग्य केन्द्राची निर्मीती केली आहे व या प्राथमिक आरोग्य केन्द्राला तिन उपकेन्द्र जोडण्यात आली आहे या आरोग्य केन्द्र आणी उपकेन्द्रातर्गत पाथरी , करगाव , आसोलाचक , भानापुर , पेन्ढरी , सायमारा , मुडांळा , पांढरसराड , चकमानकापुर , मानकापुर , मेटेगाव , पालेबारसा , जनकापुर , उसरपारचक , सायखेडा , मेहाखुर्द , मंगरमेन्ढा , सावंगी दिक्षीत आदि गावांच्या समावेश असुन , या गावातील रूग्ण पाथरी येथील आरोग्य केन्द्रात उपचारासाठी येतात . परंतु या आरोग्य केन्द्रात दोन वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती व दोन्हीही बिएएमएस या दोन अधिकारी नेमलेले होते परंतु एका अधिकाऱ्यांची काल खंड संपला असल्याने ती जागा रिक्त असुन आता इथे एकच अधिकारी आहे त्यामुळे एकावरच सर्व रूग्णांचा भार येवुन पडला आहे .तसेच कंत्राटी सिएचओ यांची एक जागा, एमपीडब्लु यांच्या दोन जागा व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची एक जागा अशातच प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने रक्त तपासणीसाठी रूग्णांची गैरसोय होतांना दिसुन येत आहे. नागरीकांचे आरोग्य लक्षात घेता आरोग्य विभागाने त्वरीत एमबिबिएस डॉक्टर तसेच रिक्त पदांची भरती त्वरीत देण्याची मागणी नागरीकांच्या वतीने भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे सचिव शरद सोनवाने यांनी केली आहे.