नेहरू युवा केंद्र नागपूर युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार व स्पर्श जनहिताय बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचा संयुक्त विद्यमाने युवा पडोस संसद युवा नेता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन हूडकेश्वर परिसरात करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री पंकजजी कोठारी प्रमुख पाहुणे श्री इशांतजी आकांत ,श्री पीयूषजी बोईनवार,श्री आनंदजी नारेकर,श्री विशालजी भोसले ,श्री हिमांशूजी पारधी ,श्री पियुषजी सुंभाटे,श्री महेशजी लोखंडे,श्री कपिलजी आदमने ,श्री सुरजजी बोन्द्रे उपस्थित होते.
या कार्यक्रमात युवक युवतींना नेहरू युवा केंद्रात भविष्यात विविध संधी मिळतील तसेच राष्ट्रीय पाणी मिशन जलशक्ती मंत्रालय भारत सरकार चा विषयी पाणी वाचावा मोहीम याबाबत पोस्टर लॉन्चिंग करून श्री कपिल आदमने अध्यक्ष स्पर्श जनहिताय बहुउद्देशीय संस्था नागपूर यांनी मार्गदर्शन केले.
युवकानी आपली स्वतःची अभ्यास पद्धती निर्माण करावी,कठीण मेहनती पेक्षा स्मार्ट वर्कवर भर द्यावा, आत्मनिर्भर भारत या विषयावर श्री पियुष बोईनवार यांनी मार्गदर्शन केले.
युवा शक्ती व युवा संघटन विषयवार श्री इशांतजी आकांत यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात करियर गाईडन्स व विविध क्षेत्रांत युवक युवतींनी आपले करियर कसे निवडावे या संदर्भात श्री पंकजजी कोठारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी प्रध्न्या करपात्रे स्वागतगीत पार्थ वन्याळकर व कुमारी तनुश्री पवार यांनी आभार केले.
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.