छत्रपति शिवजयंती निमित्त शहिद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार
छत्रपति शिवजयंती निमित्त श्री शंभू राजे प्रतिष्ठान धनवटे नॅशनल कॉलेजनागपुर , तर्फे एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ..नागपुर मध्ये प्रथमच शिवजयंती च्या पावन पर्वा वर जिल्यातील अमर शहिदजवानांच्या कुटुंबांचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार .
गेल्या चार वर्षां पासून श्री शंभू राजे प्रतिष्ठान , धनवटे नॅशनल कॉलेजचे मावळे शिवजयंती निमित्त नागपुर मधील सर्वात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढतात, पण यंदा च्या वर्षी कोरोना महामारी चा वाढता प्रादुर्भाव ध्यानीघेता शिवजयंती अत्यंत साध्या पद्धतिनि साजरी करण्याच्या निर्णय घेण्यातआला.
श्री शंभू राजे प्रतिष्ठान चे शिवभक्त संकेत दुबे यांना शिवजयंती साजरीकरण्याची एक अनोखी कल्पना सूचलि आणि ती कल्पना त्यांनीसाकार देखिल करून दाखवली.शिवजयंती चे उपलक्ष साधून अमर शहिद जवान यांच्या कुटुंबाचा सन्मानकरण्यात आला . इतकेच नाही तर अंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा देखील सत्कारकेल्या गेला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि कर्नल अजितजी हांडा सर , धनवटे नॅशनल कॉलेज चेप्राचार्य सुरेंद्र जी जिचकर सर आणि समाजसेवक दत्ताजी शिर्के होते ,शिवचरित्र व्याख्यान देण्यासाठी साक्षी राऊत यांचीउपस्थिती होती त्याचबरोबर कॉलेज चे प्राध्यापक वानखेडे सर , दाडे सर उपस्थित होते ..अमर शहीद जवानांमध्ये गेल्या वर्षी बंदीपूरा सेक्टर मध्ये शाहिद झालेलेभूषणदादा सतई यांचा संपूर्ण परिवार उपस्तिथ होता. त्याच प्रसंगी त्यांची आई मीरताई सतई यांचा सन्मान करण्यात आला .बैटल एक्सीडेंट मध्ये शाहिद झालेले बाबूराव डोंगरे यांच्या पत्नी वंदनाताई यांचा ही सन्मान करण्यात आला.ऑपेरशन रक्षक मध्ये शाहिद झालेले सुनील कुमार नखाते यांच्या पत्नी कल्पनाताई या देखिल सन्मान करण्यात आला. कोणताही देखारा न करताअत्यंत साध्या रीतीने सगळ्या कुटुंबाचे शॉल ,श्रीफळ आणि छत्रपति शिवरायांचीस्मारक देऊन यांचा सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे आंतररा्ट्रीय कराटेखेळाडू हेमा राजेंद्र घारपेंडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. श्रीशंभू राजे प्रतिष्ठान चे सर्व मावळे , विद्यार्थि आणि शिक्षक गण यांच्यासहयोगने कार्यक्रम उत्कृष्ठ यशस्वी रित्या होऊ शकला.कोरोना चे सगळे नियम पाळता सोशलडिस्टेनसिंग आणि मास्क चा वापर करूनअत्यंत अनोखा असा हा कार्यक्रम पार पडला. सहकारी मावळे - केतन बडगैय्याशुभम पिंगळे , कार्तिक कच्छवा , रुपेश , सूरज ढबाले , अनिकेत ढबाले ,रक्षल ढोके , अनिकेत पोटे , सर्वेश कराळे , तेजस , विनीत , प्रतीकभोंगाडे , आचल , त्रूनाल , प्रफुल इंगळे , तेजस , अंकुश शिरसाट , मोहितयेंडे , वैष्णव , सुमित, धिरज , निहाल , रजत चव्हाण ,सूरेंद्रा इतर अनेक मावळे उपस्थित होते.