चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर असलेल्या चिचपल्ली येथे नव्याने बांधकाम करण्यात येत असलेल्या बांबू केंद्राला भीषण आग लागली आहे.
चिचपल्ली येथील बांबू संशोधन तथा प्रशिक्षण केंद्राला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर प्रशिक्षण केंद्राला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे.
चंद्रपूरात बांबुपासून विविध वस्तू तयार करण्याचे काम बुरुढ समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण केंद्र या समाजातील युवकांमधील कलागूण सिध्द करण्याचे मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मात्र काम पूर्णत्वात येत असतानाच या प्रशिक्षण केंद्राला आग लागणे ही दुर्देवी घटना असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. त्यांनी या ठिकाणी भेट देत अधिका-यांकडून घटनेबाबत माहिती जाणून घेतली आहे. येथे आग वीजवण्यासाठी उपकरणे होती मात्र ती कार्यान्वित करण्यात आली नाही याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
#चंद्रपुरमुल मार्गावर असलेल्या #चीचपल्ली बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या आगीमुळे बांबू केंद्राचं खूप मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी काम करणारे सर्व कामगार आणि प्रशिक्षणार्थी सर्व सुरक्षित आहेत.
आग लागलेल्या चिचपल्ली बांबु प्रशिक्षण केंद्राची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी