Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी ०३, २०२१

माणसे नसलेलं गाव; असे काय घडले? एका रात्रीतून लोक गाव सोडून गेले !



कुलधारा (राजस्थान)

    "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.  घरे बेवारस सोडलेली आहेत. असे काय घडले एका रात्रीतून लोक गाव सोडून गेले?

राजस्थानमध्‍ये असे गाव आहे की जिथे घरे आहेत, रस्‍ते आहेत; पण या गावामध्‍ये मागील 200 वर्षांपासून कुणीच राहत नाही. गाव प्रमुखाच्‍या मुलीची अब्रू वाचवण्‍यासाठी 200 वर्षांपूर्वी रात्रीतूनच या गावातील सर्व ग्रामस्‍थ गाव सोडून गेले. नंतर येथे कुणीच राहायला आले नाही. परिणामी, कधीकाळी सुख समृद्धी असलेले गाव भग्नावशेषात रुपांतरित झाले असून, आता ते पर्यटन केंद्र बनले आहे. या गावाचे नाव कुलधरा असे आहे.




पालिवाला ब्राह्मणांनी वर्ष 1291 मध्‍ये हे गाव वसवल्‍याचे सांगितले जाते. त्‍यानंतर तब्‍बल 600 वर्षे या ठिकाणी ग्रामस्‍थ राहत होते. परंतु, 1800 शतकात असलेल्‍या गाव प्रमुखच्‍या नितांत सुंदर मुलीवर राज्‍याचा मंत्री सलीम सिंह याची वाईट नरज पडली. त्‍याला गाव प्रमुखाने विरोध केला. त्‍यामुळे सलीम खवळला. आता सलीम काहीही करू शकेल, या भीतीने गावातील सर्वच ग्रामस्‍थांनी रात्रीतून गाव सोडले. तेव्‍हापासून येथे कुणीही राहत नाही.


या गावाला भेट देणारे काही पर्यटक अनेक सांगतात की, त्‍यांनी या ठिकाणी गाव प्रमुखाचा आवाज, बाजारातील गोंगाट, महिलांची चर्चा, त्यांच्या बांगड्यांची खणखण ऐकली आहे. याची पुष्‍टी करण्‍यासाठी दिल्ली येथील पॅरानॉर्मल सोसायटीच्या टीमने फेब्रुवारी 2014 मध्‍ये कुलधरा आपल्‍या 18 सदस्यांबरोबर रात्र घालवली होती. कुठलाही आवाज नोंदवून घेणारे यंत्रही या टीमकडे होते. भूतप्रेताच्‍या अंधश्रद्धेमुळे या गावात आजही रात्री पर्यटक जात नाहीत.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.