ऐतीहासीक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी सुरु असलेल्या इको- प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली. यावेळी आ. जोरगेवार यांनी आंदोलकर्त्याशी चर्चा करुन त्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा केली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे अजय जयस्वाल, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, पंकज गुप्ता, हरमन जोसेफ आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहरातील गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला रामाळा तलाव आज अतिक्रमणाने गिळंकृत होत आहे. तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. त्यामूळे रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागण्यासाठी इको-प्रो च्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आले आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर आंदोलनाला भेट दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलकर्त्याच्या मागण्या जाणून घेत त्याबाबत सविस्तर चर्चा केली. रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी या मागण्या रास्त असल्याचेही यावेळी ते म्हणाले या मागण्या सोडविल्या जाव्हात यासाठी पाठपूरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी दूरध्वनी वरुन संपर्क साधत सदर आंदोलनातील मागण्यांबाबत माहिती देत चर्चा केली. रामाळा तलाव चंद्रपूरच्या नैसर्गीक सौदर्यात भर घालण्याचे काम करत असून अशा वास्तुंचे जतन होणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, फेब्रुवारी २५, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments