चंद्रपूर:दिनांक२५फेब्रुवारी२०२१:
कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च २०२० रोजी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुरवठा केला.
एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. परंतु आता वरिष्ठ कार्यालयातून या सर्व ग्राहकांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत अशा थकबाकीदारांनी थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
२४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती ,वाणिज्यिक व औदयेागिक अशा एकंदरीत ४५८५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यात चंद्रपूर ३३५८ घरगुती, १०५८ वाणिज्यिक व १६९ औदयेागिक ग्राहकांचा समावेश आहे.
चंद्रपूर मंडलातील १४९१ घरगुती , ७६७ वाणिज्यिक व ११४ औदयोगिक ग्राहक तसेच गडचिरेाली मंडलातील १८६७ घरगुती, २९१ वाणिज्यिक व ५५ औदयोगिक ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ंडीत करण्यात आला आहे.
२४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औदयेागिक अशा एकंदरीत ८८ हजार २१४ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून एकंदरीत ७० कोटीचा २० लाखाचा भरणा केला नाही.
चंद्रपूर मंडलातील ४६ हजार ८७९ हजार ग्राहकांनी ४४ कोटी ५० लाख व गडचिरेाली मंडलातील ४१ हजार ३३५ ग्राहकांनी २५ कोटी ८० लाख भरले नाही.
तर, या दहा महिण्यापासून एकही वीजबिल न भरलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औदयेागिक ग्राहकांपैकी २८ हजार २८ ग्राहकांनी २३ कोटी ७० लाखाच्या वीजबिलाचा भरणा केला व वीजपुरवठा खंडीत केल्या जाण्याच्या कारवाईपासून बचावले.
उर्वरीत सर्व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई सर्वत्र सुरु असून दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत अशा थकबाकीदरांनी थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुनिल देशपांडे यांनी केले आहे.