मॅजिक बस इंडिया फॉऊंडेशन चंद्रपूर,स्केल प्रकल्पा अंतर्गत शक्तिनगर गावातील फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना किटचे वाटप
चंद्रपूर :-मॅजिक बस इंडिया फॉऊंडेशन चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर तालुक्यातील शक्तिनगर ( दुर्गापुर ) येथे राबविण्यात येत असलेल्या फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना किट वाटप करण्यात आले.
मॅजिक बस इंडिया फॉऊंडेशन चंद्रपूर चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या शक्तिनगर गावातील २२ विद्यार्थाना करिता स्पोर्ट फॉर एक्सलेन्स हा उपक्रम गेल्या दिड वर्षापासून सुरू आहेत.स्पोर्ट फॉर एक्सलेन्स या उपक्रमातून ग्रामीण भागातील फुटबॉल खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे नेता येईल आणि यासाठी लागणारी कोचिंग देणे तसेच त्यांना किट , शूज व इतर साहित्य हे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर च्या माध्यमातून शक्तीनगर येथील १९ विद्यार्थ्यांकरिता वितरित करण्यात आले . या कार्यक्रमाला उपस्थित प्रा. विक्कि पेटकर ( फुटबॉल असो. सेपक टकरा असो. सेक्रेटरी) निखिल पोठदुखे ( नेटबॉल असो. सेक्रेटरी चंद्रपुर) प्रनोती चौधरी ( नेशनल प्लेयर फुटबॉल ), जि. प.उच्च प्राथ. शाळाचे मुख्याध्यापक पाटिल, सहायक शिक्षक यरगुदे , सहायक शिक्षका हरदे, वांडिले , सहायक शिक्षक अस्वले, इत्यादी शिक्षकांची उपस्थिती प्रार्थनीय होती. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मॅजिक बसचे फुटबॉल कोच नरेंद्र चंदेल यांनी मोलाचे सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅजिक बसचे शाळा साहायक अधिकारी यांनी केले.