Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २८, २०२१

लोकशाहीत नाक दाबल्याशिवाय कोणी तोंड उघडत नाही - अॅड. वामनराव चटप

लोकशाहीत नाक दाबल्याशिवाय कोणी तोंड उघडत नाही - अॅड. वामनराव चटप



डेरा आंदोलनाला शेतकरी संघटना व जमात- ए -इस्लामी हिंद चा पाठिंबा

 वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पाचशे कोविड योध्दे कंत्राटी कामगारांना 7 महिन्याच्या थकीत पगार व दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले किमान वेतन लागू करण्यात  यावे या मागण्यांसाठी ८ फेब्रुवारी २०२१  पासून जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर जन विकास कामगार संघाच्या नेतृत्वात मुलं-बाळ व कुटुंबासह कामगारांचे  डेरा आंदोलनाल सुरू आहे.आज या आंदोलनाचा २१ वा दिवस होता. या आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे नेते राजुरा विधानसभेचे माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप , राजूरा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष रमेश नळे नगरसेवक मधुकर चिंचोळकर तसेच अनिल बाळसराफ यांचे शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी आंदोलनकर्त्या कामगारांना संबोधित करताना एडवोकेट चटप यांनी सरकार नावाची यंत्रणा मुकी,बहिरी व आंधळी असते. आपल्या लोकशाहीमध्ये नाक दाबल्याशिवाय कोणी तोंड उघडत नाही.त्यामुळे जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन एक एकजुटीने रेटून धरा असे आवाहन करून कामगारांच्या मागण्या संदर्भात शासन व प्रशासनाच्या विविध स्तरावर पूर्ण ताकतीने लेखी पाठपुरावा करण्याचे आश्वासन  त्यांनी दिले.
         जमात -ए -इस्लामी हिंद च्या शिष्टमंडळाने सुद्धा डेरा आंदोलनाच्‍या मंडपामध्ये भेट देऊन आपले समर्थन जाहीर केले.या शिष्टमंडळांमध्ये    जमाते-ऐ-इस्लामी हिंद चंद्रपूर- गडचिरोली  चे जिल्हाध्यक्ष रफिक कुरेशी, खलील शेख , मुतांजीर अहमद खान  व मजहर अली  यांचा समावेश होता.डेरा आंदोलन म्हणजे कामगाराच्या हक्काची अनोखी लढाई असुन या आंदोलनाला सक्रिय समर्थन देण्याचे जमात-ए-इस्लामी हिंद चंद्रपूर-गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी यावेळी जाहीर केले. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.