जुन्नर शहराचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये नगराध्यक्ष शाम पांडे यशस्वी झाले - माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
जुन्नर /वार्ताहर
विकासकामे करताना ती जनतेसमोर चांगल्या पद्धतीने गेली पाहिजेत, जेणेकरुन निवडणुकांमध्ये वर्चस्व राखता येते. मागिल ४ वर्षामध्ये जुन्नर शहराचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये नगराध्यक्ष शाम पांडे यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करत जुन्नर शहरात झालेल्या सर्व विकासकामांवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. जुन्नर शहर शिवसेनेच्यावतीने कालिकामाता सभागृह जुन्नर येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार शरद सोनवणे,शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, नगराध्यक्ष शाम पांडे, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत डोके शहर संघटक शाम खोत, उपतालुका प्रमुख अविनाश करडिले, शहर समन्वयक ज्ञानेश्वर होगे, युवासेना अधिकारी विशाल परदेशी, उपनगराध्यक्ष
दीपेश परदेशी, गटनेते समीर भगत, नगरसेवक नरेंद्र तांबोळी, अविन फुलपगार, वैभव मलठणकर, विनायक गोसावी, दीपक ताटकर, साईनाथ डोके, संदीप ताजने, अमोल बनकर, सुनिल बनकर नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, कविता गुंजाळ, ज्योत्स्ना महाबरे, काळू शेळकंदे, रमेश खुडे, अथर्व जुंदरे, अमोल माळवे, मोनेश शहा, सौरभ वरपे, राकेश कर्पे, ओंकार घोटने, अजिंक्य खत्री, सिद्धांत लोणकर, संकेत आल्हाट, अक्षय काळे, शिरीष ससाणे, सोनू पुराणिक आदींसह जुन्नर शहर सर्व शिवसेना,युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
पुढे बोलताना आढळराव म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी आणण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी शरद सोनवणे यांनी देखील विकासकामांवर भर देत शिवसेना आणि नगरपालिका यांची योग्य सांगड ही नगराध्यक्ष, व सर्व नगरसेवक आणि शिवसैनिकांनी घातल्याबद्दल विशेष कौतुक केले.
विकासकामे करत असताना आत्तापासूनच उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली पाहिजे असा सल्ला माऊली खंडागळे यांनी यावेळी दिला. येणाऱ्या निवडणुका या वॉर्ड पध्दतीने असल्यामुळे आत्तापासूनच संबंधित प्रभागामध्ये उमेदवारांची चाचपणी करणे तसेच महिला संघटन वाढवणे याबाबतीत त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, गटनेते समीर भगत, अंकिता गोसावी यांनी आपली मते मांडली. शहरप्रमुख चंद्रकांत डोके, शाम खोत यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. अविनाश करडिले यांनी उपस्तीतांचे आभार मानले.
सोबत फोटो पाठविला आहे.