बंगाली कॅम्प येथील विकास कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमीपूजन
स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत बंगाली कॅम्प येथे ८ लक्ष रुपये खर्च करुन सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे व नालीचे काम मंजूर करण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते आज शनिवारी या कामाचे भुमीपूजन करण्यात आले.
यावेळी संजय रामावत, यंग चांदा ब्रिगेडचे कामागर संघटनेचे नेते विश्वजित शाहा हरमन जोसेफ, तापूष डे, नितीन शाहा, डॉ. सत्यजित पोद्दार, राहूल मोहुर्ले, राशिद हुसेन, विलास वनकर, विलास सोमलवार, सलीम शेख, आनंद रणशूर, प्रताब बिश्वास, रोहित रॉय, छोटू बिश्वास, अभिमन्य बिश्वास, राजेश दास, तुषार बिश्वास, बिट्टू दत्ता, प्रतिप शाहा, अमित मंडळ, संजय डे, राकेश मंडळ, मनिष राजवंशी, शुभम दास, राजेश दास, प्रसजित दास, राजेश दौबुले, सुनिता सिंग, श्रीती जोसेफ, रिंकू मंडल, जुली मंडल,पुष्पलता डे, आदिंची प्रामुखतेने उपस्थिती होती.
स्थानिक विकास आमदार निधीतून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामे सुरु आहे. याच अंतर्गत बंगाली कॅम्प परिसरात विकास कामासाठी ८ लक्ष रुपये देण्यात आले आहे. या निधीतून येथील कॉंक्रीटीकरण व नालीचे काम करण्यात येणार आहे. आज या कामाचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमीपूजन सोहळा संपन्न झाला. हा रस्ता तयार व्हावा अशी येथील नागरिकांची जूनी मागणी होती. आज ती पूर्ण हात असतांना मला आनंद होत असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले, या भागातील विकासासाठी माझे विशेष प्रयत्न सुरु आहे. शासनाचा मोठा निधी या भागातील विकास कामासाठी खेचून आणण्यासाठी माझा सतत पाठपूरावाही सुरु आहे. येथील अनेक विकास कामे अंतिम टप्यात असून काही कामे प्रस्तावीत असल्याचे यावेळी ते म्हणाले. तसेच या कार्यक्रमाचे भूमीपूजन संपन्न झाल्याचे यावेळी त्यांनी जाहिर केले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.