Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १९, २०२१

संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे नियुक्ती

 संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे नियुक्ती


दिनांक: 18 फेब्रुवारी 2021

      भारतीय सूचना सेवेचे वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष अजमेरा हे सन 2008 तुकडीचे अधिकारी आहेत. सध्या ते भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणार्‍या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोमहाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहत होते.

      विविध माध्यमातून सरकारी योजनांची माहिती समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवीणे आणि जनजागृती करणेहे या विभागाचे कार्य आहेसंतोष अजमेरा यांनी साचेबद्ध जनजागृती प्रकारांना फाटा देत, नवीन माध्यमांचा उपयोग करत, अनेक नवीन संकल्पना राबविल्या. भारत सरकारच्या विविध योजना, जनजागृती अभियान कार्यक्रम जसे की स्वच्छता अभियानजलशक्ती अभियान, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, आंतरराष्ट्रीय योग दिन, कोरोना जागृती, कोरोना लसीकरण इ. विषय तळागाळापर्यंत नेले आणि लक्षवेधी बनविले. सामाजिक वर्तणूक बदल घडवून आणण्यात मोठा हातभार लावला. ग्रामीण तसेच शहरी भागात या उपक्रमांना लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

      यापूर्वी देखील नवी दिल्ली येथे 2013च्या सुमारास न्यू मीडिया विंगची स्थापना करण्याची जबाबदारी अजमेरा यांनी पार पाडली आहे. याअंतर्गत ‘Talkathon’ सारखा अनोखा कार्यक्रम समोर आणला गेला, ज्याला बरेच यश मिळाले. त्यानंतर पुणे स्थित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेसाठी (National Film Heritage Mission) विशेष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. भारतीय चित्रपटांचा वारसा जतन करून ठेवण्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली. राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेसह प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा राज्य)चा कार्यभार एकाचवेळी ते सांभाळत होते. या सर्व विभागातील त्यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे अजमेरा यांची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या राज्य व केंद्रीय निवडणुकांमध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका असू शकते.

      मराठवाडा भागातून पुढे आलेले संतोष अजमेरा बॅडमिंटन खेळाडू असून लेखक देखील आहेत. आतापर्यंत त्यांनी लिहिलेल्या सात पुस्तकांचे प्रकाशन झाले आहेअजमेरा यांनी लिहिलेले ‘Ethics, Integrity and Aptitude’ हे पुस्तक अमेरिका स्थित MC Graw Hill Publication यांनी प्रकाशित केले आहे. महात्मा गांधी यांच्या जीवनाचा अभ्यास सध्या ते करत आहेत; याकरिता आयुष मंत्रालय, भारत सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.