Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी ३१, २०२१

समाजाची सेवा करणा-या घंटागाडी सफाई कामगारांच्या किमान वेतनाच्या संघर्षात मी त्यांच्या सोबत - आ. किशोर जोरगेवार #Ghantagadi #Kishor Jorgewar

समाजाची सेवा करणा-या घंटागाडी सफाई कामगारांच्या किमान वेतनाच्या संघर्षात मी त्यांच्या सोबत - आ. किशोर जोरगेवार



330 घंटागाडी सफाई कामगारांचा भव्य सत्कार, यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन   

               चंद्रपूर :  कोरोना सारख्या महाभंयकर संकटातही शहर स्वच्छ ठेवण्याचे काम घंटागाडी सफाई कर्मचा-यांनी केले. त्यांची ही सेवा कौतूकास्पद आहे. याची दखल म्हणून या सर्व कोरोना योध्दांचा सत्कार होत आहे. मात्र फक्त सत्कार करुन चालणार नाही तर त्यांच्या न्यायक मागण्यांसाठीही लढा उभारला गेला पाहिजे. या कर्मचा-यांना किमान वेतन दिल्या गेले पाहिजे यासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. या संघर्षात मी सुध्दा सहभागी असून त्यांच्या या न्यायक मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचीही माझी तयारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.


         काल जैन भवन येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घंटागाडी सफाई कर्मचा-यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उटघाटक म्हणून ऍड. पुरषोत्तम सातपूते तर प्रमूख पाहूने म्हणून ऍड. दत्ता हजारे यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगावकरशहर संघटक कलाकार मल्लारपआदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथेयंग चांदा ब्रिगेडचे कामगार नेते बाळकृष्ण जुवारघुग्घूस संपर्क प्रमूख विलास वनकरविश्वजित शाहाअल्पसंख्याक आघाडी शहर प्रमूख सलिम शेखकरणसिंह बैसराम मेंढेराहूल मोहुर्ले आदिंची मंचावर उपस्थिती होती.


        यावेळी आ. जोरगेवार पूढे म्हणाले किमहानगरपालिका ही शहराच्या मुख्य स्थानी असते. त्यामूळे शहरांच्या विकासात महानगर पालिकेची मूख्य भुमीका आहे. येथील काम सुरळीत चालण्यासाठी येथे काम करत असलेल्या कर्मचा-यांच्या प्रश्नांकडे गांभिर्यपूर्ण पाहत ते सोडविल्या गेले पाहिजे. येथील अधिकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी मी सातत्याचे पाठपूरावा केला त्याला यशही आले. राज्यशासना अंतर्गत येणा-या बाबी सोडविण्यासाठी त्या स्तरावर माझे प्रयत्न सुरु आहे. मात्र पालीकेअंतर्गत येणा-या कामगारांचे प्रश्न  सोडविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर शहराला स्वच्छते संदर्भात कोणताही पूरस्कार मिळत असेल तर त्याचे खरे हक्कदार घंटागाडी सफाई कामगार आहे. समाजाची सेवा करणारा हा कामगार उनवारापाउस झेलून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करतो. त्याचे श्रेय त्याला दिल्या गेले पाहिजे. फक्त कोरोना योध्दा म्हणून संबोधल्याने चालणार नाही. त्यांचे हक्क त्यांना दिल्या गेले पाहिजे. या कामगारांचे अनेक प्रश्न प्रंलबीत आहे. त्यात किमान वेतनानूसार वेतन देण्यात यावे ही प्रमूख मागणी आहे. या मागणीला आमचेही समर्थन असून यासाठी वेळोवेळी आमचा पाठपूरावा सुरु आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नुकतेच मनपा समोर आंदोलनही करण्यात आले आहे. पूढे ही या मागणीसाठी संघर्ष करण्याची आमची तयारी असल्याचे यावेळी ते म्हणाले. यावेळी बोलतांना अँड. पुरुषोत्तम सातपूते यांनी घंटागाडी सफाई कर्मचा-यांच्या कामाचे कौतूक केले. या कामागारांचा सत्कार होणे ही आनंदाची बाब असल्याचे सांगत यांच्या कोरोना काळातील सेवा लक्षात घेता वैदयकीय कर्मचा-यांना प्रमाणे या कामागारांनाही कोरोना लस देण्याला प्राथमीकता देण्यात यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. तर अँड. दत्ता हजारे यांनी यावेळी बोलतांना घंटागाडी सफाई कर्मचा-यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत त्या सोडविण्यासाठी सुरु असलेल्या लढयात आमचाही सहभाग असल्याचे प्रतिपादन करत घंटागाडी कर्मचा-यांनी या सत्कार सोहळ्यातून नवी उर्जा शहर स्वच्छ ठेवण्याचे काम असेच सुरु ठेवावे अशी आशा व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन सत्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 330 घंटागाडी सफाई कर्मचा-यांना प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.