जिव जोखमीत टाकत आमदार किशोर जोरगेवार यांनी फिल्मी ट्राईल पाठलाग करत पकडले दारुचे सात वाहने
- ७ वाहनांसह जवळपास १६०० पेट्या दारु जप्त, १ करोड १७ लाख ३३ हजारांचा माल जप्त
- तिन दिवसांपासून १५ गाड्यांचा ताफा होता दारु विक्रेत्यांच्या मार्गावर
- दारु विक्रेत्याचा आमदारांच्या गाडीवर गाडी चाढविण्याचा प्रयत्न
- दारु विक्रेत्यांनी कार्यवाही दरम्यान आमदारांच्या वाहणावर दारुच्या बॉटल फेकत केला हल्ला
चंद्रपूर : जिव धोक्यात टाकत फिल्मी ट्राइल दारुच्या वाहनांचा पाठलाग करत दारुच्या सात गाड्या आमदार किशोर जोरगेवार यांनी पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडल्या आहे. दारुचे हे सर्व वाहने पडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पडोली पोलीस पुढील तपास करत आहे. १ करोड १७ लाख ३३ हजार रुपये या मुद्देमालाची किंमत असून आजवरची जिल्हातील ही सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे बोलल्या जात आहे.
चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात दारु तस्करी होत असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना मिळाली होती. हि माहिती गोपनीय ठेवत या वाहनांवर स्वता कार्यवाही करण्याची योजना आमदार किशोर जोरगेवार यांनी आखली. यासाठी १५ वाहनांचा ताफा तयार करण्यात आला. मागील तिन दिवसांपासून हे वाहने दारु तस्कारांच्या मागावर होती. दरम्यान काल रात्री नागपूर मार्गे चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात दारु येणार असल्याची खात्रीजनक माहिती आमदार किशोर जोरगेवार यांच्या हाती लागली. या आधारे त्यांनी त्यांच्या १५ वाहनांचा ताफा विविध मार्गावर तैणात केला. ते स्वताही नागपूर मार्गावर होते. यावेळी पाळत ठेवली असता संशयित वाहने चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील खांबाळा जवळ पोहचताच आ. जोरगेवार यांनी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र सदर वाहने वेगाने निघून गेल्याने आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहनांचा पाठलाग सुरु केला. या दरम्याण दारु तस्कारांनी आ. जोरगेवार यांच्या वाहनावर गाडी चढविण्याचाही प्रयत्न केला. मात्र हा पर्यत्न अपयशी झाल्याने त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या काचाच्या दारुच्या बॉटला आ. जोरगेवार यांच्या वाहनावर फेकायला सुरुवात केली. परंतू आ. जोरगेवार यांनी पाठलाग सोडला नाही. त्यानंतर दारु भरलेल्या वाहनांनी वेगवेगळ्या मार्गाने गाड्या वळविल्या मात्र याच दरम्याण १५ वाहण्यांच्या ताफ्यातील काही वाहने समोरुन आली व ताडाळी ते पाडोली दरम्याच्या मार्गावर या दारुच्या वाहनांची अडवणूक करण्यात आली. यावेळी दारुची ४ वाहने पकडण्यात आली. तर येथून काही अंतरावर आ. जोरगेवार यांच्या ताफ्यातील दोन वाहनांनी दोन दारुचे वाहणे पकडलीत. यावेळी या दारुच्या वाहनाच्या सुरक्षेत असलेले पायलट वाहणही पकडण्यात आले. या कार्यवाहीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांना दूरध्वनी वरुन संपर्क साधत माहिती दिली असता तुम्ही पडोली पोलिस ठाण्याला माहिती द्या, हे आमचे काम नाही अशी उरमट भाषा वापरत टोलवाटोलवीची उत्तर दिलीत. त्यानंतर आ. जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांच्यासह पडोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कासर यांना माहिती दिली. कासर यांनी योग्य सहकार्य करत हे सर्व वाहने ताब्यात घेतली आहे. वाहनांसह १ करोड १७ लाख ३३ हजार इतकी या दारुची किंमत असून या प्रकरणी सध्या ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पूढील तपास पडोली पोलीस करत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक खाडे यांच्या भुमीकेविरोधात सर्व स्तरातून त्यांचा निषेध केला जात आहे. तर स्वता आमदारांनीच पूढे येत इतक्या मोठ्या प्रमाणात दारु पकडून दिल्याने पोलिस विभागातही खळबळ उडाली आहे.