ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हयात काँग्रेसचे वर्चस्व
चंद्रपूर :- जिल्हयातील ६०४ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून खासदार बाळूभाऊ धानोरकर, ना. विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे व आमदार प्रतिभाताई धानोरकर याचे निर्विवाद साम्राज्य स्थापित झाले आहे.
शुक्रवार दि. १५ जानेवारी ला जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे जवळपास ८० टक्के मतदान झाले. इतक्या मोठ्या संख्येने ग्रा.पं. ला मतदान होऊन त्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती काँग्रेसने काबीज केल्याने जनतेला मोदी सरकार विरोधी कल जिल्ह्यात दिसून आला आहे.
ग्रामीण भागातील राजकारणाचा कणा मानल्या. जाणा-या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस नेत्यांना ही निवडणुक अत्यंत महत्वाची होती. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मिळालेल्या दणदणीत यशामुळे सर्व पदाधिकारी कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुढील लक्ष्य चंद्रपूर महानगरपालिकेचे असल्याचे खासदार धानोरकर यांनी म्हटले आहे.