Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १६, २०२१

अर्जुनीमोरगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत

अर्जुनी मोरगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 81.25 टक्के मतदान


भरनोलीसह 11 गावांचा मतदानावर बहिष्कार

तालुक्यात सर्वत्र शांततापूर्ण मतदान.




संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.15 जानेवारी:-
आज दि.15 जानेवारी रोज शुक्रवारला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले आहे. तालुक्यात 81.25 टक्के मतदान झाले.तालुक्यात सर्वाधीक कवठा 2 येथे 96.36 तर परसटोला 1 मतदान केंद्रावर 64.04 टक्के कमी मतदान झाले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कन्हाळगाव,मांडोखाल,व देवलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली आहे.गावविकासाची मिनीमंत्रालय असलेल्या तालुक्यातील 29 ग्रामपंचायती च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रा.पं.वगळता व भरनोली गटग्रामपंचात चा निवडणुकीवर बहिष्कार असल्याने तालुक्यात 25 ग्रामपंचायती साठी आज दि.15 जानेवारी रोज शुक्रवारला सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजे दरम्यान मतदान झाले. यात 415 उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी पर्यंत 29 ग्रामपंचायती च्या 95 प्रभागातुन 261 जागांसाठी 550 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.61 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले. भरनोली गटग्रामपंचात मधे राजोली ग्रामपंचायत स्वतंत्र निर्माण होत नाही. तो पर्यंत अकरा गावातील नागरीकांनी  एकही उमेदवारी अर्ज दाखल न करता  निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. हे येथे उल्लेखनीय आहे. नवेगावबांध पोलीस ठाण्याअंतर्गत नक्सलग्रस्त संवेदनशील धाबे/पवनी, झाशीनगर, धाबेटेकडी,भसबोडन या मतदान केंद्रांवर मतदान शांतता व सुव्यवस्थेत पार पडले. अशी माहिती ठाणेदार पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांनी दिली आहे. तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावर शांततापूर्ण मतदान झाले.मतमोजणी सोमवार दि.18 जानेवारीला होणार असल्याची माहिती  निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.