Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर १४, २०२०

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष पदी प्रदीपदादा सोळुंके तर प्रदेश कोषाध्यक्ष पदी प्राचार्य डॉ. विठ्ठलराव एरंडे


डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष पदी प्रदीपदादा सोळुंके, तर प्रदेश कोषाध्यक्ष पदी प्राचार्य विठ्ठलराव एरंडे यांची निवड



शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी व्यापक लढा उभारणार


नागपूर – काल जालना येथे संपन्न झालेल्या डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय कोअर कमिटी बैठकीत विविध विषयांवर मंथन झाले. सदरील बैठकीत डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष (माध्य) पदी सुप्रसिध्द वक्ते प्रदीपदादा सोळंके (औरंगाबाद ) यांची तर प्राचार्य डॉ. विठ्ठलराव एरंडे (पुणे) यांची प्रदेश कोषाध्यक्ष (माध्य) पदी एकमताने निवड करण्यात आली. सदरील निवडीनंतर बोलताना प्रदीपदादा सोळंके यांनी शिक्षकांच्या व्यापक हितासाठी आपण सदैव तत्पर असून येणाऱ्या काळात विनाअनुदानित शिक्षकांना वेतन मिळावे, जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करावी, शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम मिळवून देण्यासाठी आपण व्यापक संघटन वाढवून मोठा लढा उभारणार असल्याचे अभिवचन दिले.
या कार्यक्रमात विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्ती पत्र देवून सन्मान करण्यात आला यात संघटनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी गोविंद मुळे, वाशीम जिल्हाध्यक्षपदी राजू जोगदंड, बीड जिल्हाध्यक्षपदी प्रवीण पंडित, परभणी जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब उघडे, लातूर जिल्हाध्यक्षपदी दत्ता माने व लातूर सचिव पदी आशिष राठोड तर मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी लक्ष्मन डोंगरे व मराठवाडा विभागीय सचिवपदी शिवशंकर स्वामी यांची निवड करण्यात आली.
नागपूर जिल्हा माध्यमिक जिल्हाध्यक्षपदी नंदलाल यादव सदरील बैठकीला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या कोअर कमिटीचे सदस्य या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील बैठक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष (प्रा) लक्ष्मण नेव्हल, सचिव सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, राज्यसमन्वयक शामराव लवांडे, नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, उपाध्यक्ष शांताराव जळते, महासचिव सतीश काळे हे उपस्थित होते. सदरील सुनियोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष के.डी. वाघ, सचिव अनंत मिटकरी, वल्लभ गाढे, आर.एन. इंगळे, व्ही. एन. घायाळ, भास्कर कढवने, संजय लोखंडे, मेघराज गवखरे, संजीव शिंदे,विनोद चिकटे, समीर शेख,नंदलाल यादव भास्कर शिंदे यांनी परिश्रम घेतले.

           

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.