नागपूर : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला वेठीस धरलं आहे. असं असताना इंग्लंडमध्ये नव्या कोरोना व्हायरसचा स्ट्रेन (Strain) प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने जगासमोर आव्हान उभे राहिले आहे. नवा विषाणू किती प्रभावी आहे यावर संशोधन सुरू असताना नागपूरमध्ये इंग्लंडहून आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे.
इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या २८ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता महाराष्ट्राचे धाबे दणाणले आहेत. दक्षिण व पूर्व इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नवीन करोना विषाणूमुळे बाधित झालेला संशयित रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.
इंग्लंडमध्ये कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाची अनेकांना लागण झालीय. यामुळे या तरूणाला नवा कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण नवीन कोरोना बाधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या कोरणा पॉझिटिव युवक नियम न पाळता नागपूर आणि गोंदिया फिरला. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या संपर्कात आलेल्या दहाजण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या युगाचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कोरोना जुना की नवीन स्पष्ट होईल.
दरम्यान नंदनवन येथे राहणारा हा 28 वर्षीय तरुण पुणे येथील कंपनीत कार्यरत आहे. कंपनीच्या कामानिमित्त तो महिनाभरापूर्वी इंग्लंडला गेला होता 29 नोव्हेंबरला नागपूरला परत आला. लक्षणे नसल्याने त्याला होम कोरन्टाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र गोंदिया येथे जाऊन आल्यानंतर त्याला लक्षणे दिसली आणि 15 डिसेंबर रोजी नंदनवन येथील आरोग्य केंद्रात यांचे करण्यात आली त्यामुळे आता महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.