Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर ११, २०२०

आपली दिवाळी पर्यावरणपुरक




डॉ. कैलास वि. निखाडे

आपली दिवाळी पर्यावरणपुरक साजरी करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दिवाळीत आतिषबाजी करण्यात आपल्याला आनंद मिळत असला तरी ते पर्यावरणाला घातक आहे.आकाशात सोडलेले फटाके फुटल्या नंतर त्यातील सेंद्रिय संयुगे हवेत मिसळतात हे प्राणघातक असू शकते .
प्रदूषण म्‍हणजे घातक दूषित किंवा तत्‍सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्‍यत: प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्‍मक ठरतात, तिला प्रदूषण म्‍हणतात. यामध्ये वायू प्रदूषण म्‍हणजे हवेमध्‍ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. ह्याच्‍यामुळे वातावरणातील पृथ्‍वीच्‍या सभोवताली असलेल्‍या वातावरणात संरक्षक ओझोन थर पातळ होऊ लागला आहे. त्‍या थराचे घनत्‍व कमी झाले आहे. परिणामी हवामानात बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. वायू प्रदूषण पुष्‍कळशा कारणांचा परिणाम आहे, सर्वच कारणे मानवी नियंत्रणाखाली नाहीत. वाळवंटातील धुळीची वादळे व जंगलातील आगीचा धूर तसेच गवतास लागणारी आग हे सर्व देखील वायू प्रदूषणाच्‍या रासायनिक व विशेष प्रदूषणात आपला वाटा उचलतात. ध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बधिरत्‍व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्‍या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतात असे तज्ञांचे म्‍हणणे आहे. वर्ल्‍ड हेल्‍थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शहरासाठी ध्‍वनि स्‍तराचे सुरक्षित मापन 45 डेसिबल असल्‍याचे निश्चित केलेले आहे. भारतातील महानगरी क्षेत्रांमध्‍ये बहुतेक 90 डेसिबलपेक्षा जास्‍त ध्‍वनिपातळीची नोंद केली जात आहे; मुंबई हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे ध्‍वनिप्रदूषित शहर आहे, आणि अशाच प्रकारचे ध्‍वनिप्रदूषण स्‍तर दिल्‍लीचे ही आहे. आवाज किंवा ध्‍वनिमुळे फक्‍त चि‍डचिड किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्‍तवाहिन्‍या संकुचित होतात, आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी वाढते ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्‍त ध्‍वनि किंवा आवाजामुळे न्‍यूरोसिस आणि नर्व्‍हस ब्रेक डाउनदेखील होतो असे तज्ञांचे मत आहे. दिवाळी सणा मध्ये फटाक्यांची आतिषबाजी जास्त प्रमाणात होते त्यामुळे फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात. तसेच अस्थमाचा अॅटॅक, ब्रॉकायटिस, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी होऊ शकते. दिवाळी हा सण थंडीच्या मोसमात येतो. त्यामुळे धुक्याबरोबर धुळीचे कणही हवेत सहज मिसळून जातात. त्यांचे विघटन होणे कठीण असते. याचे परिणाम मात्र दिवाळीनंतर दिसू लागतात, असे श्वसनरोग तज्ज्ञ प्रशांत छाजेड यांनी सांगितले. डॉ. सुजित राजन म्हणाले, की "मुंबईत वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यात फटाक्यांची भर पडते. परंतु दिवाळीत आवाज कमी झाला पाहिजे आणि सगळीकडे प्रकाश पसरला पाहिजे. कारण दिवाळीचा सण आपल्याला आयुष्यातील अंधार दूर सारून प्रकाशाच्या मार्गावर चालण्याचा संदेश देतो. म्हणूनच दिवाळीत दिव्यांची आरास केली जाते. प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट आहे. फटाक्यांचा वापर कमी करण्याबरोबरच फटाक्यांचा कालावधी आणि दर्जाकडेही लक्ष दिले पाहिजे. पुण्यातील 'चेस्ट रिसर्च फाउंडेशन'नुसार, फुलबाज्यांमुळे कमीत-कमी प्रदूषण होते. परंतु सापाच्या गोळ्यांसारख्या फटाक्यांमुळे मात्र खूप धूर होतो. त्यामुळे श्वसनविकाराचा कोणीही बळी ठरू शकतो . यामुळे कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो. जर मज्जातंतू कामातून गेले असतील, तर पुढील काही महिने काही दिवस चक्कर येते. कर्कश आवाज ऐकू येतात. आकाशात झेपावणारे रंगबिरंगी भुईनळे आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या लाल, पिवळ्या, हिरव्या निळ्या रंगाच्या विद्युत शलाकांच्या नेत्रदीपक रोषणाईमुळे संपूर्ण आसमंत उजळून निघत असला तरी या रंगबिरंगी लखलखत्या रोषणाईतून अतिशय विषारी वायू व रासा‌यनिक धातू पर्यावरणात मिसळतात.
आकाशात झेपावणारे रंगबिरंगी भुईनळे आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या लाल, पिवळ्या, हिरव्या निळ्या रंगाच्या विद्युत शलाकांच्या नेत्रदीपक रोषणाईमुळे संपूर्ण आसमंत उजळून निघत असला तरी या रंगबिरंगी लखलखत्या रोषणाईतून अतिशय विषारी वायू व रासा‌यनिक धातू पर्यावरणात मिसळतात. या विषारी धुलीकणांमुळे दिवाळीच्या काळात अस्थमाच्या रुग्णात दोन ते तीन पटीने वाढ होत असल्याचा श्वसनविकार तज्ज्ञांचा अनुभव आहे.
आपल्या पर्यावरणात आज फार मोठा बदल झाला आहे. पर्यावरणात आज नवीन नवीन वायरस जन्म घेत आहे. त्यापासून मानव जातीला वाचवण्यासाठी आपण पर्यावरणाचे रक्षणकरने व पर्यावरणात साक्षरता आणणे आपले आद्य कर्तव्य आहे. फटाक्याची आतिषबाजी करण्याऐवजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन झाडे लावून पर्यावरण पूरक आपली दिवाळी साजरी करू या.......
      
          डॉ. कैलास वि. निखाडे 
            भूगोल विभाग प्रमुख 
    राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य              महाविद्यालय, भामरागड . 9423638149, 9403510981

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.