राजुरा येथील कक्ष अधिकारी श्री जांभुळकर हे राजुरा येथील भांडी घासण्याचे काम करणाऱ्या निराधार महिला सौ. सुमन सोयाम यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत बोलून तिला गैरवर्तन देऊन पोलिसांची धमकी दिली. सदर महिला परितक्त्या प्रमाणपत्रावर सही घेण्यासाठी गेली होती यावेळी हा प्रकार घडला होता. याची गंभीरतेने दाखल घेत आदिवासी न्याय,हक्क परिषद व श्रमिक एल्गार संघटनेने सदर महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी तहसील कार्याला समोर धरणे आंदोलन सुरू केले. व धरणे आंदोलनातून राजुरा नगरपरिषदे चे जाहीर निषेध करण्यात आले. व कक्ष अधिकारी जांभुळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या व आंदोलनातून जांभूळकर यांचेवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी, राजुरा नगरपरिषदेची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात यावी, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली. यावेळी घनशाम मेश्राम यांनी निराधार महिलेचा अपमान हा देशातील संपूर्ण निराधार महिलांचा अपमान आहे असे मत व्यक्त करीत जांभूळकर यांचा निषेध केला.
धरणे आंदोलनाचे रूपांतर मोर्चा झाले व राजुरा नगर परिषदेच्या विरोधात जोरदार घोषणा देत कक्ष अधिकारी जांभुळकर यांचा निषेध करीत मोर्चा नगर परिषदेकडे वाढविला महिलांचा मोर्चा गेल्यानंतर आदिवासी महिला सुमन सोयाम यांची जांभूळकर यांना माफी मागण्यास भाग पाडले. यावेळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे परिस्थिती समजून वसंत सोयाम यांच्या परितक्ता असलेल्या प्रमाणपत्रावर कर निरीक्षक यांची सही करण्यास सांगितले व करनिरिक्षक यांनी सही दिली. यावेळी राजुरा नगर परिषदेचे कक्ष अधिकारी जांभुळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशी मोर्चेकरयांना ग्वाही दिली व मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
मोर्चाचे नेतृत्व श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष तथा आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक घनशाम मेश्राम, आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक संतोष कुळमेथे, यांनी केले. मोर्चात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे राजुरा तालुका सचिव दीपक मडावी, अभिलाष परचाके,. तुळशीराम किंनाके, पवन ताकसांडे, आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे , जिल्हा उपाध्यक्ष परमजित सिंग लघडे, आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष रोशन येवले, सहभागी होते. मोर्चात सुमन सोयाम, गंगा टेकाम, भविका मेश्राम, शैलेजा टेकाम, शीतल सिडाम, उषा लोखंडे, यासह शेकडो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.