शिरीष उगे /भद्रावती प्रतिनिधी-
भद्रावती पोलीसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत देशी दारू साठया सह 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केला यात चार आरोपींना अटक करण्यात आली ही कार्यवाही शुक्रवारला करण्यात आली
यातील अर्जुन सिंग प्रेम सिंग जुनी वय 24 वर्ष राहणार वडनेर, अजित पांडुरंग सुरसे वय 35 वर्ष राहणार राजुर कॉलरी वनी, गजानन शंकर गोहने वय 42 राहणार श्रीरामनगर भद्रावती, सुंदर रूपचंद वर्मा वय 41 राहणार नवीन सुमठाना अशी आरोपींची नावे असून हे पूर्णा सेल्स अँड सर्विस तेलवासा रोड येथे दारू साठा जमा करून विक्री करत होते ही माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी धाड टाकून चार आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले तर दुसऱ्या कारवाईत नागपूर चंद्रपूर महामार्गावर गाडी क्रमांक एम एच 08 सी 8703 ही नागपूर मार्गे चंद्रपूर कडे दारू साठा भरून येत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे टप्पा परिसरात नाकाबंदी केली असता ते वाहन मागे वळून एम्टा खाणीच्या कच्च्या रस्त्याने जात असताना त्या वाहनाचा टायर फुटल्याने चालक जागेवरून पसार झाला या दोन्ही कारवाईतील दारू साठा व वाहन असा 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चीटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार, निकेश ढेंगे यांनी केली.