Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर १६, २०२०

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार

बहुजन कल्याणाची कास धरा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली अपेक्षा


नागपूर - १६ ऑक्टोबर-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती करिता निवड झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार ना. डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते ऊर्जा अतिथी भवन नागपूर येथे पार पडला.
विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना जीवनात यशाची उत्तरोत्तर शिखरे गाठत असतांना आपली नाळ मात्र कायम बहुजन कल्याणासाठी जोडून ठेवा असा मोलाचा सल्ला आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
  शिक्षण हे वैयक्तिक विकासासह, सामाजिक जाणीवा समृद्ध करणारे राष्ट्र विकासासाठी आयुष्यभर पुरेल अशी शाश्वत शिदोरी आहे.  परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांचा वैचारिक वारसा जोपासणारे आपण बिनीचे शिलेदार आहात. आपल्या जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि खडतर परिश्रमाचे कौतुक म्हणून ज्ञानार्जनाच्या उत्तुंग भरारीला बळ देण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या वैचारिक क्रान्तीचा एक पाईक म्हणून मला निश्चितच सार्थ अभिमान आहे असेही ते पुढे म्हणाले.  फुले - शाहू- आंबेडकरांच्या विचारांच्या मजबूत पायाभरणीतून आधुनिक राष्ट्र निर्माणात ह्या विद्यार्थ्यांचे अतुलनीय योगदान राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
या सत्कारप्रसंगी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत व प्रेरणादायी शुभेच्छापत्र ना. डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  
  महाराष्ट्रातील एकूण ५४ विद्यार्थ्यांची निवड सामाजिक न्याय विभागाने परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरिता केली असून यातील १६ विद्यार्थी हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. यापैकी १० विद्यार्थी आज उपस्थित होते.तन्मय आटे पदव्युत्तर पदवी वाणिज्य किंग्स कॉलेज लंडन, गौरव मेश्राम अभियांत्रिकी मँचेस्टर विद्यापीठ, तन्मय मून अभियांत्रिकी कोलंबिया विद्यापीठ, निनाद गायकवाड अभियांत्रिकी न्यूयॉर्क विद्यापीठ, स्नेहा घोडेस्वार अभियांत्रिकी सिडनी विद्यापीठ, निखिल रामटेके अभियांत्रिकी सिडनी विद्यापीठ, अक्षय पाटील पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन साऊथवेल्स विद्यापीठ, रुणाली वालमांडे व्यवस्थापन, क्वीन्सलँड विद्यापीठ, डॉक्टरेट पीएचडी करीता यामिनी मेश्राम, विज्ञान मँचेस्टर विद्यापीठ, साक्षी गजभिये, व्यवस्थापन बर्मिंगहॅम विद्यापीठ, संकेत नागदेवे अभियांत्रिकी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, निमिष उके, अभियांत्रिकी न्यू साऊथवेल्स विद्यापीठ, पंकज गोईकर, अभियांत्रिकी, लँक्सटार विद्यापीठ याप्रमाणे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 


  या व्यतिरिक्त सामाजिक न्याय विभागाच्या यादीनुसार पदव्युत्तर पदवी कला -२ विद्यार्थी, वाणिज्य - २, विज्ञान -२ , अभियांत्रिकी - २५, व्यवस्थापन- ८,
 डॉक्टरेट पीएचडी कला- २, वाणिज्य- १, विज्ञान- ५, व्यवस्थापन - १, अभियांत्रिकी- ६,  अश्याप्रकारे निवड झालेली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.