Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर २०, २०२०

छत्रपती राजारामांच्या रक्षणार्थ औरंगजेबाचे गर्वहरण करणारी लढवय्यी राणी चेन्नमा

⭕   छत्रपती राजारामांच्या रक्षणार्थ औरंगजेबाचे गर्वहरण करणारी लढवय्यी राणी चेन्नमा    ⭕

____________________________
   माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
╰──────•◈•──────╯
____________________________
.        📯 दि  २० आॅक्टोबंर २०२0 📯

फेसबुक लिंक http://bit.ly/2FGRzse
  .         राणी लक्ष्मीबाई सारखीच शूर आणि पराक्रमी राणी भारतीय इतिहासात होऊन गेली आहे, या राणीने खुद्द मुघल मुघलबादशाह औरंगजेब याला सुद्धा जेरीस आणले होते. चला तर जाणून घेऊया काय आहे ही कहाणी!त्या राणीचे नाव आहे- केलाडी साम्राज्याची राणी चेन्नमा!


*_..............................................._*
╔══╗ 
║██║      _*M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞    *      _ 
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
राणी चेन्नमा सुरुवातीच्या काळात तिच्या सुसंस्कृतपणामुळे ओळखली जात असे. परंतु या स्त्रीने इतिहास बदलला आणि स्त्रियांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले. भारतीय इतिहासातील लढवय्या स्त्रियांमध्ये तिला मानाचे स्थान दिले जाते. आपल्या राज्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा तिने धैर्याने सामना केला आणि प्रजेची रक्षणकर्ती राणी म्हणून राणी चेन्नमा पुढे नावारूपाला आली.
⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾
राणी चेन्नामाने कर्नाटकाच्या किनारपट्टीवर वसलेल्या ‘केलाडी’ या छोट्याश्या प्रांतावर २५ वर्ष (१६७१ ते १६९६) राज्य केले. ती लिंगायत समाजाच्या सदप्पा शेट्टी यांची पुत्री होती. तिचे लग्न सोमेश्कारा नायक या राजाबरोबर झाले आणि त्यांच्या मृत्यू नंतर तिने राज्यकारभार आपल्या हाती घेतला. प्रजेच्याही मनात तिच्याबद्दल आदर होता. त्यांच्या प्रत्येक सुख दु:खात ती जातीने लक्ष घालीत असे. शरणागती पत्करणे हे तिच्या रक्तातच नव्हते जणू! आपल्या राणीचा हाच खंबीरपणा पाहून सैन्य देखील अगदी जीवाची बाजी लावून युद्धात उतरायचे.
तिचा हाच खंबीरपणा एकदा मुघल बादशाह औरंगजेबाच्या अंगाशी आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती राजाराम यांनी मुघलांच्या कैदेतून पळ काढला. छत्रपती राजाराम यांना राणी चेन्नमा हिने आपल्या राज्यामध्ये आश्रय दिला. हे औरंगजेबाला सहन झाले नाही आणि त्याने तत्काळ युद्ध करण्याचा प्रस्ताव दिला. राणी चेन्नमाने देखील सरळ सरळ युद्धामध्ये उतरत औरंगजेबाच्या पुरुषी वर्चस्वाला हादरा दिला. एका स्त्रीवर सहज विजय मिळवू शकू आणि छत्रपती राजारामांना पुन्हा कैद करू अश्या अविर्भावात लढाईस गेलेल्या मुघल सेनेला कसलेल्या केलाडी सैन्याने लवकरच सळो की पळो करून सोडले. या मानहानीकारक पराभवामुळे औरंगजेबाचे मात्र चांगलेच गर्वहरण झाले.
जर राणी चेन्नमाने छत्रपती राजाराम यांना मुघल साम्राज्याच्या कैदेतून सुटका करण्यासाठी मदत केली नसती तर चेन्नमा राणी आणि मुघलांमध्ये कधीच युद्ध झाले नसते आणि मुघल साम्राज्य कधीच पराभूत झाले नसते.
राणी चेन्नमाने आपल्या शेजारील राज्यांसोबत शांतीपूर्वक धोरण अवलंबले. भारतात नव्याने पाउल ठेवणाऱ्या पोर्तुगीजांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले आणि आपले राज्य समृद्ध केले. 

पोर्तुगीज मसाले आणि तांदूळ केलाडी बंदरातून निर्यात करत असत, यामुळे त्यांना व्यापार करणे सुलभ होतं असे. राणी चेन्नमाने पोर्तुगीजांना आपल्या प्रांतात येऊन राहण्यास आणि चर्च उभारण्यास परवानगी दिली होती.
राणीच्या कृपाशीर्वादामुळे खुश झालेले पोर्तुगीज तिला रेईना दि पिमेंता म्हणजेच ‘द पेपर क्वीन’ म्हणत असत. तिचे साम्राज्य १७६३ पर्यंत टिकून होते. तिच्या वैयक्तिक आयुष्यात ती खूप शिस्तबद्ध होती. न्याय करताना ती कोणाचीही हयगय करत नसे.
चेन्नमा राणी एक धार्मिक वृत्तीची स्त्री आणि तिच्या काळातील व्यावहारिक प्रशासक म्हणून ओळखली जात होती. कर्नाटक राज्यामध्ये आजही लोक तिची आठवण काढतात.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.